Prithviraj Chavan on Loksabha Election :"एक्झिट पोल टीव्ही चॅनेल्सचा टीआरपी वाढवण्याचा मार्ग आहे. निवडणूका संपल्यानंतर आपल्याला वाट पाहावी लागते. दरम्यानच्या काळात जाहिराती तर मिळत असतात. त्यामुळे टीआरपी वाढवण्यासाठी प्रयत्न सुरु असतात. मला वाटत चार तारखेचे आपण वाट पाहिली पाहिजे. 4 तारखेला दुपारी 1 ते 2 पर्यंत संपूर्ण चित्र स्पष्ट होईल. एक्झिट पोल दाखवतात, तसंच चित्र असेल अशातला भाग नाही. आपल्याला माहिती आहे की, 2004 मध्ये काय घडलं होतं. अटलजी पुन्हा सत्तेत येतील, असं एक्झिट पोलमध्ये सांगण्यात आले होते. मात्र, वाजपेयी सत्तेत आले नाहीत. ठीक आहे एक्झिट पोल त्यांचे काम करतात. इंडिया आघाडीचे बहुमत तर येईलच. पण महाराष्ट्रात माझं आकलन असे आहे की, महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षाला मिळून कमीत कमीत 32 जागा येतील, यामध्ये अपक्षही आम्हाला सपोर्ट करतील, अशी आशा आहे", असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. ते एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलत होते.
एबीपी सी वोटर एक्झिट पोल
महायुती
भाजप : 17
शिंदे गट : 6
अजित पवार गट : 1
महाविकास आघाडी
ठाकरे गट : 9
काँग्रेस : 8
शरद पवार गट : 6
इतर : 1
एनडीए (NDA) : 353-383
इंडिया आघाडी (INDIA Alliance) : 152-182
इतर : 4 -12
एक्झिट पोलबाबत नाना पटोले काय म्हणाले?
एक्झिट पोल गोदी मीडियाचे आहेत. त्यामुळे आमचे मत हे 4 तारखेला बघू. आमच्या सगळ्या उमेदवारांना आम्ही सांगितले आहे की, शेवटचे मत मोजल्याशिवाय मतमोजणी केंद्रातून बाहेर पडायचे नाही. निवडणुकीत अटीतटीची लढाई होईल. केंद्रीय गृहमंत्रालयाने 150 जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावले आहे. भाजप घाबरलाय हे यातून स्पष्ट होत असल्याचेही नाना पटोले (Nana Patole) म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या