Agnipath Protest: आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी लष्कराच्या तिन्ही सेना प्रमुखांची स्वतंत्र बैठक घेतली. पंतप्रधानांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीत अग्निपथ योजनेबाबत (Agnipath scheme) चर्चा झाली. लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे (Army Chief manoj pande), नौदल प्रमुख अॅडमिरल आर हरी कुमार आणि हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी यांच्यासोबत बैठक झाली.


सर्वप्रथम नौदल प्रमुख अॅडमिरल आर हरी कुमार पंतप्रधानांच्या निवासस्थानी पोहोचले. नौदल प्रमुखांसोबतची बैठक संपल्यानंतर हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी यांनी भेट घेतली आणि शेवटी पंतप्रधानांनी लष्करप्रमुख जन मनोज पांडे यांची भेट घेतली. सेवाज्येष्ठतेनुसार एकापाठोपाठ एक बैठका झाल्या. अ‍ॅडमिरल आर हरी कुमार हे तिन्ही लष्करप्रमुखांमध्ये सर्वात ज्येष्ठ आहेत. जनरल पांडे तिसऱ्या क्रमांकावर आहेत. पंतप्रधान मोदींनी तिन्ही लष्करप्रमुखांची 30 मिनिटे स्वतंत्रपणे भेट घेतली.


अग्निपथ लष्करी भरती योजना 14 जून रोजी जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर देशाच्या विविध भागांमध्ये हिंसक निदर्शने सुरू झाली आहेत. आंदोलकांनी यापूर्वी अनेक गाड्या आणि बसेस पेटवल्या होत्या. पंतप्रधान मोदींच्या भेटीपूर्वी लष्कर, वायुसेना आणि नौदलाच्या प्रमुखांनी पुन्हा एकदा अग्निपथ योजना आणि अग्निवीरांच्या भरती प्रक्रियेबाबत संयुक्त पत्रकार परिषद घेतली. दरम्यान, अग्नीपथ योजनेच्या भरती प्रक्रियेबद्दल बोलताना लष्करी व्यवहार विभागाचे अतिरिक्त सचिव, लेफ्टनंट जनरल अनिल पुरी म्हणाले की, अग्निपथ योजना सरकारच्या अनेक विभागांमधील सल्लामसलत व्यतिरिक्त, तीन सेवा आणि संरक्षण मंत्रालयातील दीर्घकालीन सल्लामसलतचा परिणाम आहे. या सुधारणेची अत्यंत गरज असल्याचे ते म्हणाले.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Agneepath Scheme : अग्निवीरांच्या भरती प्रक्रियेला सुरूवात, काय आहेत नियम आणि अटी?   
Anand Mahindra : अग्निपथविरोधात हिंसक आंदोलन, उद्योजक आनंद महिंद्रा यांनी केली मोठी घोषणा
Agnipath Protests : अग्निपथ योजनेत मोठा बदल, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची माहिती