Agnipath Protests:  केंद्र सरकारने लष्कर भरतीसाठी नवीन अग्निपथ योजनेची (Agneepath Scheme) घोषणा केली आहे. मात्र, या योजनेला देशभरातून विरोध होताना दिसत आहे. देशभरातील विद्यार्थी आणि विद्यार्थी संघटना रस्त्यावर उतरुन जोरदार निषेध व्यक्त करताना दिसत आहेत. आज आज सुमारे 700 रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज संरक्षण दलातील प्रमुख अधिकाऱ्यांसह उच्चस्तरीय बैठक घेतली. दरम्यान, या अग्निपथ योजनेत आता मोठा बदल करण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अग्निपथ योजनेत केलेल्या बदलाबाबतची माहिती दिली आहे.


अग्निपथ योजनेतील बदल


अग्निपथ योजनेला विरोध होत असताना केंद्रीय गृहमंत्रालयाने आणखी एक निर्णय जाहीर केला आहे. या योजनेंतर्गत 4 वर्षे सेवा बजावणाऱ्या जवानांना भरती प्रक्रियेत प्राथमिकता देण्यात येणार आहे. तर, आसाम रायफल्स आणि सीएपीएफ तुकड्यांमध्ये भरती होणाऱ्यांना भरती प्रक्रियेत 10 टक्के आरक्षण देण्यात येईल. तर, कोविडमुळे लांबलेल्या 2 वर्षांच्या भरतीप्रक्रियेमुळे या योजनेतील उमेदवारांना भरतीसाठीची वयोमर्याद वाढवण्यात आली असल्याची माहिती खुद्द गृहमंत्री अमित शाह यांनी ट्वीट करुन दिली आहे. अग्निपथ योजनेची वयोमर्यादा 21 वरून 23 करण्यात आली आहे. भारतीय नौदलातील अग्निवीरांसाठी मर्चंट नेव्हीमध्ये रोजगाराच्या संधी देण्यात येमार आहे. कोविडमुळे भरतीमध्ये दोन वर्षांचा ब्रेक पाहता अग्निपथ योजनेची वयोमर्यादा 21 वरून 23 आली आहे. पोलीस भरतीमध्ये देखील अग्निवीरांना प्राधान्य देणार असल्याचे सांगितले आहे. 


 






13 राज्यात आंदोलन


देशातील अनेक राज्यामध्ये या योजनेला मोठा विरोध होताना दिसत आहे. केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेविरोधातील हे लोण जवळपास 13 राज्यात पसरलं आहे. बिहारसह उत्तर प्रदेश, तेलंगणा, दिल्ली, राजस्थान, हरयाणा, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, उत्तराखंड, मध्य प्रदेश, ओडिशा या राज्यात आंदोलकांनी उग्र निदर्शने केली आहेत. यात बिहार आणि तेलंगणध्ये प्रत्येकी एक आंदोलकाचा मृत्यू झाला आहे.


 






बिहारमध्ये हिंसक वळण


अग्निपथ योजनेच्या विरोधात सुरु झालेल्या आंदोलनाला बिहारमध्ये हिंसक वळण लागलं आहे. भडकलेल्या जमावानं ट्रेन आणि इतर मालमत्तेला आग लावली आहे. ज्यामुळे पोलिसांना राज्यातील 18 जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद केली आहे. बिहारमध्ये आतापर्यंत 325 जणांना अटक करण्यात आली आहे. बिहारबरोबरच मध्य प्रदेश, केरळ या राज्यांमध्ये या योजनेला विरोध वाढताना दिसत आहे.


तेलंगणामध्ये देखील हिंसक आंदोलन सुरु आहे. तिथेही एका आंदोलकाचा मृत्यू झाला आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे.  चंद्रशेखर राव यांनी पीडित कुटुंबाला 25 लाख रुपयांची मदत आणि कुटुंबातील एका पात्र सदस्याल सरकारी नोकरी देण्याची घोषणा केली आहे. या घटनेमुळे राव  आणि भाजप यांच्यात शाब्दिक युद्ध सुरु झाले आहे. मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी राकेशच्या मृत्यूसाठी केंद्राच्या कार्यपद्धतीला जबाबदार धरले आहे.