Prakash Solanke बीड : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या स्टार प्रचारक पदी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांची नियुक्ती झाल्याबाबत राष्ट्रवादीचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके (Prakash Solanke) यांनी धनंजय मुंडे यांचे अभिनंदन केले आहे. धनंजय मुंडे चांगले वक्ते आणि प्रभावी नेते आहेत. त्यांना संधी मिळाली, त्यांचा सहकारी म्हणून आनंद झाला असल्याचे ते म्हणाले. मात्र मी माजलगाव आणि धारूरसाठी अजित पवार (Ajit Pawar) यांची सभा मागितली आहे. पालकमंत्री म्हणून आम्हाला त्यांच्याकडून काही अपेक्षा आहेत, असे आमदार प्रकाश सोळंके म्हणालेत. (Prakash Solanke On Dhananjay Munde)
Prakash Solanke : ...तर निवडणुकीनंतर एकत्र येऊनच महायुती कारभार करेल
नगरपरिषद निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, कार्यकर्त्यांना मानसन्मान आणि काम करण्याची संधी मिळावी, यासाठी ही निवडणूक आहे. बीडमध्ये भाजप आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रमुख आहेत. युती झाली असती तर नाराजी झाली असती म्हणून बहुतांश ठिकाणी दोघेजण वेगवेगळे लढत आहेत. आता जरी युती झालेली नसली तरी निवडणुकीनंतर एकत्र येऊनच महायुती कारभार करेल, असा माझा विश्वास आहे. असेही आमदार प्रकाश सोळंके म्हणालेत
Prakash Solanke On Ajit Pawar : पालकमंत्री म्हणून आम्हाला त्यांच्याकडून काही अपेक्षा आहेत
बीडच्या माजलगाव मतदारसंघातल्या दोन नगरपरिषदा आमच्या ताब्यात येतील, असा आमचा विश्वास आहे. परळी नगरपरिषदेत बहिण भावाचं एकत्र येणं हे स्वाभाविक आहे. यामध्ये फार काही राजकीय पाहण्याचं कारण नाही. धनंजय मुंडे चांगले वक्ते आणि प्रभावी नेते आहेत. त्यांना संधी मिळाली त्यांचा सहकारी म्हणून आनंद आहे. मात्र मी माजलगाव आणि धारूरसाठी अजित पवार यांची सभा मागितली आहे. पालकमंत्री म्हणून आम्हाला त्यांच्याकडून काही अपेक्षा आहेत. असेही प्रकाश सोळंके म्हणालेत. दुसरीकडे माजलगावमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी प्रबळ दावेदार आहेत. त्यामुळे या मतदारसंघात चुरशीची लढत होण्याची शक्यात आहे.
Prakash Solanke : मला विरोध करण्यासाठी नाथरामधील फार्म हाऊसवर बैठका
दरम्यान, नुकतेच आमदार प्रकाश सोळंके यांनी आमदार धनंजय मुंडे यांच्यावर पुन्हा एकदा गंभीर आरोप केलेत. माजलगाव मतदार संघातील माझे विरोधक व त्यांच्याशी संबंधित असलेल्या लोकांची परळी तालुक्यातील नाथरा येथील फार्म हाऊसवर बैठका होत आहेत. याबाबतची चर्चा संपूर्ण मतदारसंघात असल्याचे प्रकाश सोळंके यांनी म्हटले आहे. याबाबत आपण पक्षश्रेष्ठींना, अजित पवारांना यापूर्वीच कल्पना दिल्याची माहितीही प्रकाश सोळंकी यांनी दिली होती.
इतर महत्वाच्या बातम्या