Who Is Jaisingh Solanke? बीड : आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी (Vidhan Sabha Election 2024) बीडच्या (Beed News) राजकीय वर्तुळात (Maharashtra Politics) मोठी घडामोड घडली आहे. अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) बीडमधील माजलगावचे (Majalgaon) आमदार प्रकाश सोळंके (Prakash Solanke) यांनी आगामी विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा केली आहे. सध्या प्रकाश सोळंके आगामी 2024 च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघातील गावांचे दौरे करत आहेत. याचवेळी त्यांनी यंदाची विधानसभा लढवणार नसल्याची घोषणा केली. तसेच, आपले राजकीय वारसदार म्हणून जयसिंह सोळंके (Jaisingh Solanke) यांच्या नावाची घोषणा केली आहे. 


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचील दिग्गज नेत्यांच्या फळीतील एक नाव म्हणजे, प्रकाश सोळंके. त्यांनी राष्ट्रवादीच्या काळात अनेक मंत्रीपदंही भूषवली आहेत. गेल्या निवडणुकीत एका सभेतील भाषणादरम्यान, 2024 ची निवडणूक आपली शेवटची निवडणूक असल्याचं सांगितलं होतं. 2019 ची विधानसभा निवडणूक पार पडली. महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. पण, त्यावेळी मंत्रीपदाची माळ मात्र प्रकाश सोळंकेंच्या गळ्यात पडली नाही. त्यामुळे पुढे अनेक दिवस सोळंकेंचं 'राजीनामा नाट्य' सुरू होतं. पण, त्यांना मंत्रीपद मिळालंच नाही. अखेर त्यांची समजूत काढल्यानंतर त्यांनी मतदारसंघात कामं करायला सुरुवात केली. 


प्रकाश सोळंकेंसोबत गेल्या अनेक वर्षांपासून जयसिंह सोळंके राजकारणात सक्रीय आहेत. जयसिंह यांना जिल्हा परिषदेत बांधकाम सभापतीही बनवलं. मतदार संघातील माजलगाव, वडवणी आणि धारूर तालुक्यात ते सक्रीय आहेत. त्यामुळेच तेच भविष्यात राष्ट्रवादी पुढे नेणार, अशी चर्चा सुरू झाली होती. अशातच आता खुद्द प्रकाश सोळंके यांनीच जयसिंह सोळंके यांना आपला राजकीय वारसदार घोषित केल्यामुळे सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. जयसिंह यांना जिल्हा परिषदेत बांधकाम सभापती म्हणूनही काम पाहिलं आहे. मतदार संघातील माजलगाव, वडवणी आणि धारूर तालुक्यात ते सक्रिय आहेत. त्यामुळे तेच भविष्यात राष्ट्रवादी पुढे नेणार, अशी चर्चा सुरू झाली होती. 


आमदार प्रकाश सोळंकेंनी राजकीय वारसदार म्हणून घोषणा केलेले जयसिंह सोळंके कोण?


माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांचे लहान बंधू धैर्यशील सोळंके यांचे जयसिंह सोळंके हे चिरंजीव आहेत. म्हणजेच, प्रकाश सोळंके यांचे सख्खे पुतणे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रकाश सोळंकेंसोबत जयसिंह सोळंके राजकीय वर्तुळात कार्यरत आहेत. काकांचा हात धरुन राजकारणात पाय ठेवलेल्या जयसिंह साळंके यांनी आतापर्यंत पंचायत समिती, जिल्हा परिषदेत अनेक महत्त्वाची पदं भूषवली आहेत. माजलगाव, वडवणी आणि धारूर तालुक्यात ते सक्रिय आहेत. 


जयसिंह सोळंके धारूर पंचायत समितीचे उपसभापती राहिले आहेत. त्यासोबतच बीड जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेस युवकचे जिल्हाध्यक्ष म्हणून जयसिंह सोळंके यांनी यापूर्वी काम पाहिलं होतं. आता जयसिंह सोळंके हेच प्रकाश सोळंके यांचे वारसदार म्हणून आगामी विधानसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे.


जयसिंह सोळंके यांचे वडील धैर्यशिल सोळंके यांचाही मतदार संघात चांगला दबदबा आहे. तर सहकार, शेती आणि राजकारण जयसिंह सोळंके यांची जमेची बाजू आहे. यापूर्वी राजकारणात पाय ठेवताच जयसिंह सोळंके यांना पंचायत समितीचं उपसभापती म्हणून संधी भेटली आणि त्यांनी त्या संधीचं सोनंही करून दाखवलं. त्यानंतर, युवक आघाडीचे जिल्हाध्यक्षपद सांभाळत असलेल्या जयसिंह सोळंके यांना नंतर जिल्हा परिषदेचं सभापतीपद मिळालं. त्यांनी काकांना आग्रह करुन बांधकाम आणि अर्थ समिती पदरात पाडून घेतली. जयसिंह सोळंकेंनी फार पूर्वीपासूनच विधानसभेची तयारी सुरू केली होती. त्यांच्याकडे असलेल्या जिल्हा परिषद सभापतीपदामुळे विधानसभेची बांधणी त्यांना सोयीची झाली आहे.


बीड जिल्हा परिषद सदस्य म्हणूनही जयसिंह सोळंके यांनी काम केलं आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिलं आहे. राजकारणात सक्रीय असलेल्या जयसिंह सोळंके यांच्या नावाची आता काका प्रकाश सोळंकेंनी राजकीय वारसदार म्हणून घोषणा केली आहे. अशातच आता विधानसभा निवडणुकीची संधीही त्यांना मिळणार आहे, अशी चर्चा तालुक्यात सुरू आहे.