Election Symbol : प्रकाश आंबेडकरांना प्रेशर कुकर,  महादेव जानकरांना शिट्टी, लोकसभेसाठी कुणाला कोणतं चिन्हं?

Lok Sabha Election Symbol : परभणीतून वंचितच्या तिकिटावर लढणारे हवामान अभ्यासक पंजाब डक यांना रोड रोलर हे चिन्ह मिळालं आहे. त्यांची लढत रासपचे जानकर आणि शिवसेनेचे बंडू जाधव यांच्याशी होणार आहे. 

Continues below advertisement

मुंबई : राज्यातल्या पहिल्या टप्प्याच्या निवडणुकीसाठी आज चिन्हांचं वाटप झालं असून वंचितच्या प्रकाश आंबेडकरांना (Prakash Ambedkar) अकोल्यामध्ये प्रेशर कुकर (Pressure Cooker) या चिन्हावर लढावं लागणार आहे. तर परभणीमधून (Parbhani) महायुतीच्या पाठिंब्यावर लढणारे रासपचे नेते महादेव जानकरांना (Mahadev Jankar) शिट्टी हे चिन्ह मिळालं आहे. 

Continues below advertisement

अकोला लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणारे वंचित बहुजन आघाडीने प्रमुख प्रकाश आंबेडकर यांना प्रेशर कुकर हे चिन्ह मिळालं आहे. अकोल्यात वंचित, भाजप आणि काँग्रेसमध्ये तिहेरी लढत होणार आहे. या ठिकाणी प्रकाश आंबेडकर यांची लढत ही भाजपचे अनुप धोत्रे आणि काँग्रेसचे अभय पाटील यांच्याशी होणार आहे. 

परभणीत महादेव जानकर यांची शिट्टी विरुद्ध संजय जाधवांची मशाल

परभणी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांना शिट्टी हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे. त्यामुळे जानकर हे आता महाविकास आघाडीचे शिवसेनेचे उमेदवार बंडू जाधव यांच्या मशालीला टक्कर देणार आहेत. 

महत्त्वाचं म्हणजे वंचित बहुजन आघाडीकडून उभे असलेले हवामान अभ्यासक पंजाब डक यांना रोड रोलर हे चिन्ह मिळालं आहे. परभणीत एकूण 34 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत. यातील बहुजन समाज पार्टीचे उमेदवार आलमगीर खान यांनाच राष्ट्रीय पक्षाचे चिन्ह असलेले हत्ती तसेच भारतीय कम्युनिस्ट पार्टीकडून कॉ. राजन क्षीरसागर यांना विळा-भोपळा हे त्यांच्या पक्षाचे अधिकृत चिन्ह मिळाले आहे.

अमरावती लोकसभा निवडणूक 

अमरावती लोकसभा निवडणुकीत 37 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. शेवटच्या दिवशी एकूण 19 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. अमरावतीत भाजप उमेदवार नवनीत राणा, मविआचे उमेदवार बळवंत वानखडे, प्रहारचे उमेदवार दिनेश बुब आणि रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर यांच्यात लढत होणार आहे. 

अमरावती लोकसभा निवडणुकीत चिन्ह वाटप होताच उमेदवारांनी प्रचाराला सुरवात केल्याचं दिसतंय. 26 एप्रिल रोजी अमरावती लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. 

मशाल चिन्हाच्या विरोधात समता पार्टी सर्वोच्च न्यायालयात जाणार

शिवसेना ठाकरे गटाला निवडणूक आयोगाने दिलेले मशाल चिन्ह हे तात्पुरत्या स्वरूपात होतं. सर्वोच्च न्यायालयाने हे तात्पुरत्या स्वरूपात दिलेले चिन्ह पुढच्या आदेशापर्यंत ठाकरे यांना दिलं आहे. हे चिन्ह ठाकरे यांच्याकडून काढून घेण्यासाठी आम्ही पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत असं समता पार्टीचे अध्यक्ष उदय मंडल यांनी म्हटलं आहे. 

ही बातमी वाचा: 

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola