Pune Crime News : एका निलंबित एमबीबीएस (MBBS) डॉक्टरसह तिघांना पुणे पोलिसांच्या (Pune Police) अमली पदार्थ विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. धक्कादायक, म्हणजे, तो एका नामांकित रुग्णालयात प्रॅक्टिस करत असतानाच त्याला यापुर्वीही ड्रग्ज प्रकरणातच पकडले होते. त्यानंतर त्याला निलंबित केले होते. त्यानंतर आता त्याला दुसऱ्या वेळेस पकडण्यात आले आहे. तिघांकडून तब्बल 11 लाख 43 हजार रुपयांचे मेफेड्रोन जप्त केले आहे.
पुण्यातील बिबवेवाडी भागात ड्रग्जची तस्करीच्या संदर्भातील माहिती पोलिसांना मिळाली होती
दरम्यान, यातील एक आरोपी हा मुळचा जम्मूचा असून त्याचे एमबीबीएसचे शिक्षण झालेले आहे. त्याने डॉक्टर म्हणून काही रुग्णालयात काम देखील केले होते. पुण्यातील मध्यभागात असलेल्या एका नामांकित रुग्णालयात तो प्रॅक्टिस देखील करत होता. परंतु, त्याला काही महिन्यांपूर्वी पोलिसांनी ड्रग्ज प्रकरणात पकडले होते. नंतर त्याला निलंबित करण्यात आले होते. पुण्यातील बिबवेवाडी भागात ड्रग्जची तस्करी करणारे काही तरुण आले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर त्याला ताब्यात घेतलं होतं. पोलिसांनी त्यांची झडती घेतली असता तिघांकडून एकूण 15 लाख 73 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
तीन दिवसापूर्वीच नागपूरमध्येही घडली होती एमडीची तस्करीची घटना
नागपूरच्या गुन्हेगारी (Nagpur Crime) विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. नागपुरातील माजी नगरसेवकाच्या मुलाला एमडीची तस्करी (MD Drugs) करताना पोलिसांनी अटक केली आहे. माजी नगरसेवक अजय बुग्गेवार यांचा मुलगा संकेत बुग्गेवार (Sanket Buggewar) याला एमडी तस्करी करताना गणेशपेठ पोलिसांनी अटक केली आहे. या धडक कारवाईत पोलिसांना त्याच्याकडून 16.07 ग्राम एमडी पावडर आढळली असून जवळपास 1.67 लाख रुपयाच्या एमडी पावडरसह 18.17 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. संकेत हा माजी नगरसेवकांचा मुलगा असून तो बॉडी बिल्डर आणि जिम ट्रेनर देखील आहे. संकेत अजय बुग्गेवार हा नागपूरचे माजी नगरसेवक अजय बुग्गेवार यांचा मुलगा असून संकेतने नोव्हेंबर 2022 मध्ये दिल्ली येथे बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक आणि मिस्टर इंडिया टायटल देखील जिंकले होते. दरम्यान या ड्रग्ज विक्री प्रकरणात माजी नगरसेवकाच्या लेकाचे नाव आल्याने आणि त्याला अटक करण्यात आल्याने नागपूरच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे
महत्वाच्या बातम्या: