Anil Patil, नंदुरबार : "प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना पाडण्याच्या विडा उचललाच पाहिजे. काँग्रेसला देशाची परिस्थिती सुधारता आली नाही. नरेंद्र मोदी सत्तेत आल्यापासून परिस्थिती सुधारण्याच्या काम सुरु झाले. प्रकाश आंबेडकर यांनी ती परिस्थिती बघितली आहे. यामुळे काँग्रेसचे उमेदवार पाडलेच पाहिजेत", असा टोला अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री अनिल पाटील यांनी लगावला. ते नंदुरबार येथे बोलत होते.
नाशिकची जागा मिळावी
अनिल पाटील म्हणाले, जिल्ह्यात कुठेही मतभेद नाहीत. मात्र काही मतभेद असल्यास तातडीने मिटवणार आणि महायुतीच्या उमेदवाराला विजय करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. नाशिकच्या जागेवरून मतभेद सुरू आहेत. परंतु , मेरिटवर ही जागा दिली जाणार आहे. नाशिकची जागा मिळावी यासाठी कार्यकर्त्यांनी मागणी केली आहे. परंतु दोन ते तीन दिवसात नाशिकच्या जागेच्या तिढा सुटणार असल्याचेही अनिल पाटील यांनी सांगितले.
काँग्रेस रसातळाला पोहोचली आहे
संपूर्ण महाराष्ट्रासह देशात काँग्रेसच्या धुव्वा उडणार आहे. त्यानंतर राहुल गांधी ईव्हीएममध्ये घोटाळा झाला असल्याचा आरोप करतील. काँग्रेस रसातळाला पोचली आहे. आपलं अपयश लपवण्यासाठी राहुल गांधी असे वक्तव्य करत आहेत. आपलं संघटन कुठेतरी कमी पडत आहे. याकडे पाहण्याऐवजी राहुल गांधी एजन्सी आणि न्याय देणाऱ्या न्याय देवतावर शंका उपस्थित करत आहेत.
बारामती लोकसभा निवडणूक एकतर्फी होणार
मनमोहन सिंग सरकारच्या काळात निवडणूक आयोग विदेशातून आणले होते का? महाविकास आघाडीतील उमेदवारांना पाडण्याच्या विडा आंबेडकरांनी बरोबर उचला आहे. बारामती लोकसभा निवडणूक ही एकतर्फी होणार असून, विजय शिवतारे यांच्या मधल्या असलेला गैरसमज दूर केला आहे. बारामती मतदारसंघातील महायुतीतील नेते मधले समन्वय योग्य पद्धतीने सुरू आहे.
दानवे कुठल्या पक्षात जातील याची मला कल्पना नाही
अंबादास दानवे यांच्या यांच्या बद्दल मला कल्पना नाही. परंतु गेल्या अनेक महिन्यापासून त्यांची अस्वस्थता मी बघत आहेत. त्यांच्यावर ज्या अविश्वास दाखवला जात आहे. सातत्याने आमच्या लक्षात येत आहे. दानवे कुठल्या पक्षात जातील याची मला कल्पना नाही आहे. त्यांनी कुठल्या पक्षात जावं हा त्यांच्या अधिकार आहे. पक्ष वाढीसाठी भाजप कोणाचे स्वागत करत असेल तर राष्ट्रवादी त्याच्यापेक्षाही जास्ती स्वागत करेल, असंही अनिल पाटील म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या