Prakash Ambedkar Meet CM Devendra Fadnavis मुंबई : बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांचे हत्या प्रकरण आणि परभणीतील हिंसाचारानंतर (Parbhani Violence) न्यायालयीन कोठडीत असलेले सोमनाथ सूर्यवंशी (Somnath Suryawanshi) यांच्या मृत्यू प्रकरणामुळे राज्याचे वातावरण चांगलेच तापले आहे. एकीकडे संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ आज बीडमध्ये (Beed) सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात आला. तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या भेटीसाठी दाखल झाले. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज सकाळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी परभणी घटनेच्या संदर्भात महत्वाच्या मागण्या केल्या आहेत. परभणी प्रकरणातील पीडित सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुबीयांना 1 कोटी रुपयांची भरपाई द्यावी, अशीही मागणी ॲड. आंबेडकर यांनी केली आहे.
ॲड. आंबेडकर यांनी केलेल्या काही प्रमुख मागण्या -
1) परभणी प्रकरणातील पीडित सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांना 1 कोटी रुपये नुकसान भरपाई द्यावी.
2) सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी द्या.
3) परभणीत पोलिसांनी क्रूरतेने केलेल्या मारहाणीत बळी पडलेल्यांची यादी करण्यासाठी आणि पुरेशी भरपाई देण्यासाठी सर्वेक्षण करा.
4) 1 जानेवारी रोजी होणाऱ्या भीमा कोरेगावच्या अभिवादन सोहळ्यापूर्वी फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांविरुद्ध कोणत्याही प्रकारचा हिंसाचार आणि चुकीची माहिती भडकावण्याच्या कोणत्याही प्रयत्नांवर लक्ष ठेवण्यासाठी आणि ते हाणून पाडण्यासाठी पोलिसांना निर्देश द्यावेत.
5) आदिवासी विद्यार्थ्यांसाठी थेट लाभ हस्तांतरण (DBT) योजना रद्द करा आणि पूर्वीची प्रणाली पुन्हा सुरू करावी.
दरम्यान, परभणीत पोलिसांनी क्रूरपणे केलेल्या मारहाणीत बळी पडलेल्यांची यादी करून त्यांना पुरेशी भरपाई देण्याची आणि आदिवासी विद्यार्थ्यांसाठी डीबीटी रद्द करण्यासाठी सल्लामसलत करण्यासाठी, सर्वेक्षण करण्याची आमची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केली आहे.
मराठा क्रांती ठोक मोर्चाची मागणी
सरपंच संतोष देशमुख यांचं प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवण्यात यावे, सर्व आरोपींवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात यावी, सर्व आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, याप्रकरणामध्ये ज्येष्ठ विधीतज्ज्ञ उज्ज्वल निकम व विधीतज्ज्ञ सतीश माणशिंदे यांची नियुक्ती व्हावी, हे प्रकरण बीड या ठिकाणी न चालवता मुंबई न्यायालायकडे वर्ग करण्यात यावे, अशी मागणी मराठा क्रांती ठोक मोर्चाने केली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या