Prakash Ambedkar and Mahayuti : पीएम नरेंद्र मोदींना (Narendra Modi) पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीने कंबर कसलीये. भारतीय जनता पक्षाने काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक नेते गळाला लावले. मात्र, आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) आणि भारतीय जनता पक्षाचे आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेचे पदाधिकारी आणि नेते फोडून निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत. 


धाराशिवमध्ये माजी पोलिस अधिकारी निवडणूक लढवणार 


प्रकाश आंबेडकरांनी धाराशिवमध्ये शिंदे गटाचे नेते भाऊसाहेब आंधळकर यांना गळाला लावलय. त्यांना वंचितकडून उमेदवारी देण्यात आली आहे. तर मुंबईच्या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात आंबेडकरांनी भाजपाला मोठा धक्का दिलाय. भाजपा उत्तर पश्चिम जिल्हा उपाध्यक्ष संजीव कलकोरी यांची भाजपला सोडचिठ्ठी देत वंचितकडून लोकसभा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. 




वंचितमध्ये प्रवेश होण्यापूर्वीच उमेदवारी जाहीर 


एकीकडे सत्ताधारी भाजपा पक्षामध्ये विरोधी पक्षातील अनेक इच्छुक उमेदवार प्रवेश करत असतानाच उत्तर पश्चिम मुंबई जिल्ह्यात मात्र भाजपाला मोठा धक्का बसला आहे. उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी नाकारल्यामुळे उपाध्यक्ष संजीव कलकोरी यांनी भाजपाला सोडचिट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे. वंचितमध्ये प्रवेश करण्यापूर्वीच संजीव कलकोरी यांची उमेदवारी देखील जाहीर झाली होती. आज ते आपल्या शेकडो समर्थकांसह वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश करणार आहेत. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार आहे.


वंचितचे 35 उमेदवार लोकसभेच्या रिंगणात 


वंचित बहुजन आघाडीने बुधवारपर्यंत 25 उमेदवार जाहीर केले होते. दरम्यान, गुरुवारी प्रकाश आंबेडकर यांनी 10 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीत लिंगायत, मुस्लीम, मराठा, ब्राम्हण, अशा सर्व जातींच्या लोकांना उमेदवारी देऊन प्रकाश आंबेडकरांनी सोशल इंजिनिअरिंग करण्याचा प्रयत्न केला आहे. शिवाय प्रकाश आंबेडकरांनी मुंबईतून एका उत्तर भारतीय उमेदवारालाही निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. 








इतर महत्वाच्या बातम्या 


Sharad Pawar Meet Chandrarao Tawre : शरद पवारांकडून विरोधकांच्या भेटीगाठी; भाजपच्या चंद्रराव तावरेंच्या भेटीला, बंद दाराआड 10 मिनिटं चर्चा