VBA Fifth Candidate List : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभा निवडणुकीसाठी 5 वी उमेदवार यादी जाहीर केली आहे. यापूर्वी वंचितने 25 उमेदवारी जाहीर केले होते. आजच्या यादीतून वंचितने आणखी 10 उमेदवार जाहीर केले आहेत. मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या महायुतीला पाठिंबा देण्याच्या निर्णयानंतर उत्तर मुंबईतून वंचितकडून उत्तर भारतीय उमेदवार देण्यात आला आहे. 


धाराशिवमधून भाऊसाहेब आंधळकर रिंगणात


दक्षिणमध्य मधून वंचितचे मुंबई अध्यक्ष अबुल हसन खान निवडणूक लढवणार आहेत. याआधी त्यांना उत्तर मध्य मुंबईतून उमेदवारी जाहीर झाली होती. उत्तर मुंबईतून बीना रामकुबेर सिंह उमेदवार असणार आहेत. तर धाराशिवमधून माजी पोलीस अधिकारी भाऊसाहेब आंधळकरांना उमेदवारी देण्यात आली आहे. 


रायगडमधून कुमुदानी चव्हाण यांना वंचितकडून उमेदवारी देण्यात आली आहे. मुंबईतील तीन जागांवर वंचितकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. शिवाय, पुढील 2-3 दिवसात मुंबईतील इतर मतदारसंघातील उमेदवारांवर शिक्कामोर्तब होणार असल्याची सूत्रांची माहिती सूत्रांनी दिली आहे. 


कोणाला कोठून उमेदवारी 


वंचितकडून आणखी 10 जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. रायगड, धाराशिव, नंदुरबार, जळगाव, दिंडोरी, पालघर, भिवंडी, उत्तर मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, दक्षिण मध्य मुंबई या जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. 


1. दक्षिण मध्य मुंबईमधून वंचितचे  अध्यक्ष अबुल हसन खान  - मुस्लीम 


2. उत्तर मुंबई - बीना रामकुबेर सिंह उमेदवार  - क्षत्रिय 


3. धाराशिव - भाऊसाहेब आंधळकर - लिंगायत 


4. रायगड -  कुमुदानी चव्हाण - मराठा 


5. उत्तर पश्चिम मुंबई - संजीव कुलकोरी - ब्राम्हण 


6. दिंडोरी  - गुलाब बरडे - भिल


7. पालघर - विजया म्हात्रे - मल्हार कोळी - 


8. भिवंडी - निलेश सांबरे - हिंदू कुंबी


9. नंदुरबार - हनुमंत सुर्यवंशी - टकरे कोळी 


10. जळगाव - प्रफुल्ल लोढा - जैन 


मुंबईतील तीन जागांवर वंचितकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. 






इतर महत्वाच्या बातम्या 


विजयराव एखाद्याच्या मागे लागले की, सळो की पळो करुन सोडतात, मागचा पुढचा विचार करत नाहीत, वर्षा बंगल्यावर काय काय घडलं? अजित पवारांनी भर सभेत सांगितलं