Prajwal Revanna : कर्नाटकातील अश्लील व्हिडीओ केस प्रकरणातील आरोपी आणि खासदार प्रज्ज्वल रेवण्णाकडून (Prajwal Revanna) बंगळुरुच्या सेशन कोर्टात अंतरिम जामिनासाठी याचिका दाखल केली आहे. सध्या विदेशात असलेल्या प्रज्ज्वले रेवण्णाने भारतात येण्यापूर्वीच जामिनासाठी धडपड सुरु केली आहे. प्रज्ज्वलच्या जामिनासाठी त्याची आई भवानी रेवण्णा यांच्याकडून याचिका दाखल करण्यात आली आहे. 


भारतात पोहोचताच एसआयटीकडून अटक होण्याची शक्यता 


लैंगिक शोषणाच्या आरोपांमध्ये अडकलेला प्रज्ज्वल रेवण्णा (Prajwal Revanna) शुक्रवारी (दि.29) बंगळुरुमध्ये दाखल होणार आहे. प्रज्ज्वलचे विमान सकाळी 8 वाजता बंगळुरू विमानतळावर दाखल होणार असल्याचे बोलले जात आहे. रेवण्णा विमानतळावर दाखल होताच तपासासाठी नेमण्यात आलेल्या एसआयटीकडून अटक होऊ शकते. 


लैंगिक अत्याचाराचे आरोप प्रज्ज्वल रेवण्णाने फेटाळले 


प्रज्ज्वल रेवण्णाने (Prajwal Revanna) 27 मे रोजी एक व्हिडीओ शूट करुन ट्वीटरवर पोस्ट केला होता. या व्हिडीओमधून  मी 31 मे रोजी भारतात परतणार असल्याचे रेवण्णाने सांगितले होते. अश्लील व्हिडीओ केस प्रकरणातही त्याने भाष्य केलं होतं. माझ्याविरोधात राजकीय षडयंत्र रचण्यात आल्याचे म्हणत रेवण्णाने लैंगिक अत्याचाराचे आरोप फेटाळले होते. मी विदेशात जाताच माझ्याविरोधात आरोप करण्यात आले. गोंधळ निर्माण करण्यात आला. 26 एप्रिलला मतदान पार पडले, तेव्हा याबाबत कोणतीही चर्चा नव्हती, असं प्रज्ज्वल रेवण्णाने म्हटलं होतं. 


भारतात कधी परतणार? प्रज्ज्वल रेवण्णाने सांगितलं 


जेडीएसचा निलंबित खासदार प्रज्ज्वल रेवण्णा (Prajwal Revanna) याने काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ पोस्ट केला होता. यामध्ये तो भारतात कधी परतणार याबाबत भाष्य केलं होतं. "मी 31 मे रोजी भारतात परतणार आहे. 26 एप्रिलला मतदान पार पडले, तेव्हा याबाबत कोणतेही प्रकरण चर्चेत नव्हते. मला विदेशात असताना माझ्याविरोधात होत असलेल्या आरोपांची माहिती मिळाली", असं प्रज्ज्वल रेवण्णाने सांगितलं होतं. 


माझ्याविरोधात काँग्रेसचे राजकीय षडयंत्र 


माझ्याविरोधात काँग्रेस नेते राहुल गांधी आणि त्यांच्या पक्षाने माझ्याविरोधात आरोप करण्यास सुरुवात केली. काँग्रेसने माझ्याविरोधात राजकीय षडयंत्र रचले आहे. एसआयटीने शुक्रवारी (दि.31) मे रोजी सकाळी 10 मी एसआयटी चौकशीला सामोरे जाणार आहे. माझ्याकडून या प्रकरणाची संपूर्ण माहिती देण्यात येईल. मी एसआयटी चौकशीचे समर्थन करत आहे. माझ्या न्यायव्यवस्थेवर भरोसा आहे, असंही रेवण्णा (Prajwal Revanna) म्हणाला होता. 




इतर महत्वाच्या बातम्या 


Anjali Damania : मी सिद्धांतावर जगते, माझ्यावर थर्ड ग्रेड स्टेटमेंट करणाऱ्या चव्हाणला समज द्या; अंजली दमानिया अजितदादांवर भडकल्या