Prajakta Mali on Suresh Dhas, Mumbai : " एका सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सत्कार स्वीकारताना काढलेला फोटो ती आमची एकमेव भेट आहे. धन्यवाद हा आमच्यातील एकमेव संभाषण आहे", असं अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) म्हणाली आहे. भाजप आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर टीका करताना प्राजक्ता माळी हिचं नाव घेतलं होतं. त्यानंतर संतापलेल्या प्राजक्ता माळीने आज सुरेश धस (Suresh Dhas) यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. शिवाय त्यांनी माफी मागावी असंही माळी म्हणाली आहे. मुंबईतील पत्रकार परिषदेत अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) बोलत होते. 


प्राजक्ता माळी म्हणाली, बीड जिल्ह्यातील माननीय आमदार सुरेश धस यांनी काल प्रसार माध्यमांशी बोलताना जी टिप्पणी केली त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी मी तुमच्यासमोर आली आहे. गेले दीड महिने अत्यंत शांतपणाने मी या सगळ्याला सामोरे जात आहे. मी ट्रोलिंग आणि नेगेटिव्ह कमेंट्सला सामोरे जात आहे. ही माझी शांतता मूक संम्मती नाही. ही कलाकाराची हतबलता आहे. हे शांत राहाणं तुमच्यामुळे आमच्यावर कुठेतरी बेतललं आहे. एक व्यक्ती रागाच्या भरात बोलते. त्या दोन वाक्याचे हजारो वाक्य बोलले जातात.  चिखलफेक चालू राहते, महिलांची अब्रू निघत राहते, सर्वांचे मनोरंजन होतं राहतं म्हणून यात पडले नाही. गटारात दगड टाकणं मला योग्य वाटलं नाही. हा विषय खोटा आहे. त्याला काही बेस नाही.


पुढे बोलताना प्राजक्ता माळी म्हणाली, आपल्यासाठी न्याय मागावा आपल्या हक्कांचं रक्षण करावं, आपलं रक्षण करावं अशी ज्यांच्याकडून आपली अपेक्षा आहे. अशी मंडळी जेव्हा आपल्यावर चिखल फेक करतात तेव्हा ही गोष्ट गांभीर्याने घ्यावी वाटली.  म्हणूनच आज मी तुम्हाला सगळ्यांसमोर आले. काल जर हे असं बोलले नसते तर मी तशी शांत बसले होते.  मी याच्यावर कधी कधी भाष्य केलं नसतं पण काल त्यांनी ते वक्तव्य केल्यामुळे मला आज तुम्हा सगळ्यांसमोर यावं लागलं. कारण जेव्हा एक लोकप्रतिनिधी असतो जो हजारो लाखोंचा नेतृत्व करतो.


लाखो जनता त्यांच्या विचारांना फॉलो करते. जेव्हा ते बोलतात तेव्हा त्यांची विचारधारा लाखोंशी विचारधारा होते ते त्या गोष्टींवर कुठेतरी ठसा उमटवतात आणि खरी आहे असं भासवतात. तेव्हा मात्र ही फार गंभीर बाब होऊन जाते. माझा एक बेसिक प्रश्न आहे सुरेश धस साहेबांना... तुम्ही एक राजकारणी आहात. आम्ही कलाकार आहोत. तुम्ही एका दुसऱ्या राजकारणावर कुठेतरी करताय टीका करताय. तुमचं जे काय चालू आहे, तुमचं जे काय चालेल. तुम्ही ते करत राहा, असंही प्राजक्ता माळी म्हणाली. 




इतर महत्त्वाच्या बातम्या


मनोज जरांगे 8 व्या नंबरवर, शेवटी संभाजीराजे; बीडच्या मोर्चात पहिलं कोण बोललं, 9 नेत्यांची जोरदार भाषणं