एक्स्प्लोर

मोदी 2024 मध्ये पंतप्रधान होणार नाहीत, भाजप 230 चा आकडा ओलांडणार नाही: संजय राऊत

Sanjay Raut: मोदी आणि शाह यांना देशातील बेरोजगारी दिसत नाही. अभिषेक घोसाळकरची हत्या विचार करायला लावणारी आहे.

मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप पक्ष २२० ते २३० चा आकडा ओलांडणार नाही. त्यामुळे नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत, ही आमची गॅरंटी आहे, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले. महाराष्ट्र एकेकाळी देशाचे नेतृत्त्व करत होता. पण महाराष्ट्राची सध्याची परिस्थिती अत्यंत भयंकर आहे. दिल्लीत महाराष्ट्राची अवस्था पायपुसण्यासारखी झाली आहे. राज्यकर्ते मूग गिळून गप्प आहेत. काही लोक मोदींना शिवाजी महाराज म्हणायला लागले आहेत. काल संसदेत एका मराठी खासदाराने मोदींना युगपुरुष म्हटले. या खासदराला लाज वाटली पाहिजे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे भाजपचे कॉन्ट्रॅक्ट लेबर आहेत, अशी टीका राऊत यांनी केली. ते रविवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या लोकाधिकार अधिवेशनाच्या व्यासपीठावर बोलत होते. 

महाराष्ट्रात दोन लोकांनी भूमिपूत्रांसाठी लढा सुरु केला. एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे म्हणजे बाळासाहेब ठाकरे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातून शिवसनेची स्थापना झाली. आपल्याला घाटी म्हणून हिणवले गेले. याच मराठी माणसाने मुंबई टिकवली. मराठी माणसाला नोकऱ्या हव्या आहेत. खोटी आश्वासनं द्यायला बाळासाहेब ठाकरे हे काही मोदी नव्हते. पंतप्रधान मोदी २०१४ पासून सांगतायत की, वर्षाला दोन कोटी रोजगार देऊ. मग आतापर्यंत २० कोटी नोकऱ्या व्हायला पाहिजे होत्या. मात्र, आता मोदी सांगतायत की पकोडे तळा, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

भाजप हा फक्त उत्तर भारतीय पक्ष: कुमार केतकर

काँग्रेसचे माजी राज्यसभा खासदार कुमार केतकर यांनी लोकाधिकार अधिवेशनाच्या व्यासपीठावरुन भाजपवर टीकास्त्र सोडले. मोदी-शाह यांना वाटायला लागलं आहे की, आपल्याला पुन्हा तेवढ्या जागा मिळणार नाहीत. त्यामुळे ते अनेक घोषणा करत आहेत. आपणही त्यांच्या आहारी जात आहोत. भाजप हा फक्त उत्तर भारतीय पक्ष आहे. दक्षिणत त्यांना कुठेच स्थान नाही. मग भाजप कशाच्या जोरावर राष्ट्रीय पक्ष असल्याचा दावा करतो, असा सवाल केतकर यांनी केला. गुजराती मंत्री कसा अपमान करतात आणि मराठी माणसाकडे कसे तुच्छतेने पाहतात, याचा अनुभव आम्ही संसदेत दररोज घेतला आहे. आम्हाला भाजपचे अनेक खासदार भेटतात. ते सांगतात की, आमच्यावरही ईडीची नजर आहे. वेळ आली तर हे खासदार मोदी आणि शाह यांच्याविरोधात उभे ठाकतील. ते म्हणतात की, तुम्ही विरोधी पक्षाचा रीच वाढवा, त्याचा फायदा आम्हालाच होईल, असे केतकर यांनी सांगितले.


गुजरातची गिफ्ट सिटी ओसाड पडलेय: केतकर

गुजरातमधील बहुचर्चित गिफ्ट सिटी ओसाड पडलेली आहे. हिरे व्यापाऱ्यांनाही मुंबईतच राहायचे आहे. मुंबईत जे मिळू शकतं ते गुजरातमध्ये मिळू शकत नाही. डायमंड मार्केटमधील कर्मचारी आणि कामगारही मराठी आहेत. मात्र, नरेंद्र मोदी आणि अमित शाह महाराष्ट्रावर सूड उगवत आहेत, असे केतकर यांनी म्हटले.

 

आणखी वाचा

"देश 500 वर्ष मागे नेण्याची तयारी, मोदी-शाह अश्मयुगात घेऊन जाताय"; संजय राऊत कडाडले

 

 

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Vishakha Raut : रश्मी ठाकरेंच्या अत्यंत जवळच्या नगरसेविकेच्या पदावर टांगती तलवार; पक्षाकडून कायदेशीर लढाईबाबत हालचाली सुरु, नेमकं प्रकरण काय?
रश्मी ठाकरेंच्या अत्यंत जवळच्या नगरसेविकेच्या पदावर टांगती तलवार; पक्षाकडून कायदेशीर लढाईबाबत हालचाली सुरु, नेमकं प्रकरण काय?
इथेनाॅलमुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या किंमती दणादण वाढल्या? आता केंद्र सरकारने केला खुलासा
इथेनाॅलमुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या किंमती दणादण वाढल्या? आता केंद्र सरकारने केला खुलासा
Maharashtra Live News Updates: राहुल गांधी यांचा आज महाराष्ट्र दौरा; पुण्यात साधणार विद्यार्थ्यांशी संवाद
Maharashtra Live News Updates: राहुल गांधी यांचा आज महाराष्ट्र दौरा; पुण्यात साधणार विद्यार्थ्यांशी संवाद
Abdul Sattar Meet Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंची सत्तारांसमोर एकनाथ शिंदेंबाबत तक्रार; अब्दुल सत्तार म्हणाले, 'मी मित्र म्हणून आलोय', नेमकं काय घडलं?
मनोज जरांगेंची सत्तारांसमोर एकनाथ शिंदेंबाबत तक्रार; अब्दुल सत्तार म्हणाले, 'मी मित्र म्हणून आलोय', नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhatrapati Sambhaji Nagar Boy Jumps Down From Mountain: मुलाने iPhone साठी जीवन संपवल्याची चर्चा; आता प्रत्यक्षदर्शीने वेगळचं सांगितलं, डोंगरावर काय घडलं?
मुलाने iPhone साठी जीवन संपवल्याची चर्चा; आता प्रत्यक्षदर्शीने वेगळचं सांगितलं, डोंगरावर काय घडलं?
Udgir Crime News : तब्बल 2 हजार 134 कोटींचा महाघोटाळा; 16 कंपन्यांशी संगनमत करून निधी थेट परदेशात पाठवला, आयकर विभागाच्या तीन दिवसाच्या तपासानंतर प्रकार उघड
उदगीरमध्ये तब्बल 2 हजार 134 कोटींचा महाघोटाळा; 16 कंपन्यांशी संगनमत करून निधी थेट परदेशात पाठवला, आयकर विभागाच्या तपासानंतर प्रकार उघड
आयफोन हे कारण नाही, ती केवळ चर्चा; पोलिसांच्या तपासातून वेगळीच माहिती, DCP नवलेंकडून स्पष्टीकरण
आयफोन हे कारण नाही, ती केवळ चर्चा; पोलिसांच्या तपासातून वेगळीच माहिती, DCP नवलेंकडून स्पष्टीकरण
नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
Jaggery Price Hike : साखरेनंतर आता गुळानेही खाल्ला भाव; एक गुळासाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये, सामान्य नागरिकांच्या खिशावर भार
साखरेनंतर आता गुळानेही खाल्ला भाव; एक गुळासाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये, सामान्य नागरिकांच्या खिशावर भार
इथेनाॅलमुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या किंमती दणादण वाढल्या? आता केंद्र सरकारने केला खुलासा
इथेनाॅलमुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या किंमती दणादण वाढल्या? आता केंद्र सरकारने केला खुलासा
Pune Congress VS ABVP Rada : त्या मुलीवर दबाव टाकला; भेटू दिलं नाही, रूममध्ये कोंडलं, रात्रीच्या सुमारास सीओईपी कॉलेजमध्ये काय घडलं? विजय वडेट्टीवार अन् शिवानी वडेट्टीवारांनी सांगितली घटना
त्या मुलीवर दबाव टाकला; भेटू दिलं नाही, रूममध्ये कोंडलं, रात्रीच्या सुमारास सीओईपी कॉलेजमध्ये काय घडलं? विजय वडेट्टीवार अन् शिवानी वडेट्टीवारांनी सांगितली घटना
Sugar Import: मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारचं मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी
मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारचं मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी
Embed widget