PM Modi Japan Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जपान दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. ते मंगळवारी जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्या अंत्यसंस्कारात सहभागी होणार आहेत. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी पंतप्रधानांच्या जपान दौऱ्याबद्दल सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्या शासकीय अंत्यसंस्कारात सहभागी होण्यासाठी टोकियोला रवाना झाले आहेत.
जपानला रवाना होण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी ट्वीट केले आहे. ज्यात ते म्हटले आहे की, "माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्या शासकीय अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासाठी मी आज रात्री टोकियोला जात आहे." त्यांनी आबे यांना प्रिय मित्र आणि भारत-जपान मैत्रीचा मोठा समर्थक म्हटले आहे. सर्व भारतीयांच्या वतीने शोक व्यक्त करण्यासाठी जपानचे पंतप्रधान किशिदा आणि श्रीमती आबे यांची भेट घेणार असल्याची माहिती देखील पंतप्रधान मोदींनी दिली आहे.
जपानच्या पंतप्रधानांसोबत द्विपक्षीय बैठक
पंतप्रधान मोदी म्हणाले की, “आबे यांच्या संकल्पनेनुसार भारत-जपान संबंध अधिक दृढ करण्यासाठी आम्ही काम करत राहू.” तत्पूर्वी, परराष्ट्र सचिव विनय मोहन क्वात्रा यांनी ही माहिती देताना पत्रकारांना सांगितले की, सुमारे 12 ते 16 तासांच्या प्रवासानंतर पंतप्रधान मोदी त्यांचे जपानी समकक्ष फुमिओ किशिदा यांच्यासोबत द्विपक्षीय बैठका घेणार आहेत.
दरम्यान, जपानच्या नारा शहरात आबे यांच्यावर एका व्यक्तीने मागून गोळी झाडली. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांना त्यांना वाचवण्यात अपयश आलं. आबे यांच्यावर हा हल्ला झाला तेव्हा ते एका छोट्या जाहीर सभेला संबोधित करत होते. गोळी लागल्याने त्यांना हृदयविकाराचा झटकाही आला होता. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आलं होत.
इतर महत्वाच्या बातम्या:
YouTube Channels Blocked: चुकीची माहिती पसरवणाऱ्या 10 यूट्यूब चॅनेलवर केंद्र सरकराची कारवाई, 45 व्हिडीओही ब्लॉक
भारतातील पहिल्या चावी आँकोलॉजी इमेज बँकेची स्थापना, कॅन्सरवरील संशोधनाला मिळणार चालना