YouTube Channels Blocked: केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने मोठी कारवाई करत 10 यूट्यूब चॅनेलवर बंदी घातली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने (I&B Ministry) 10 चॅनेलवरील सुमारे 45 व्हिडीओ ब्लॉक केले आहेत. संबंधित व्हिडीओ ब्लॉक करण्याचे आदेश 23 सप्टेंबर रोजी माहिती तंत्रज्ञान (इंटरमीडिएट गाइडलाइन्स आणि डिजिटल मीडिया एथिक्स कोड) नियम, 2021 च्या तरतुदींनुसार जारी करण्यात आले होते. ब्लॉक केलेला व्हिडीओ 1 कोटी 30 लाखांहून अधिकवेळा पाहिले गेले आहेत. 


का ब्लॉक करण्यात आले व्हिडीओ? 


मिळालेल्या माहितीनुसार, यात चुकीची माहिती असलेल्या बातम्या आणि धार्मिक समुदायांमध्ये द्वेष पसरवण्याच्या उद्देशाने मॉर्फ केलेल्या व्हिडीओंचा (Morph Video) समाविष्ट आहेत. या व्हिडीओंमध्ये सरकारने काही समुदायांचे धार्मिक अधिकार काढून घेतले आहे, असे सांगण्यात आले होते. तसेच यात धार्मिक समुदायांविरुद्ध हिंसक धमक्या, भारतात गृहयुद्धाची घोषणा करण्यात आली, असे सांगणारे व्हिडीओ देखील होते. अशा व्हिडीओंमध्ये जातीय तेढ निर्माण करण्याची आणि देशातील सार्वजनिक सुव्यवस्था बिघडवण्याची क्षमता असल्याचे आढळून आले आहे.


मंत्रालयाने ब्लॉक केलेले काही व्हिडीओ अग्निपथ योजना, भारतीय सशस्त्र सेना, भारताचे राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणा, काश्मीर इत्यादी मुद्द्यांवर प्रचार करण्यासाठी वापरले जात होते. हे व्हिडीओ राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातून आणि परकीय राज्यांशी भारताच्या मैत्रीपूर्ण संबंधांच्या दृष्टीने संवेदनशील असल्याचे आढळून आले आहे. काही व्हिडीओंमध्ये जम्मू -काश्मीर आणि लडाखच्या काही भागांना भारताच्या सीमेतून बाहेर असल्याचं दाखवण्यात आलं आहे. अशा प्रकारचे कार्टोग्राफिक चुकीचे चित्रण भारताच्या सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेसाठी हानिकारक असल्याचे आढळून आले आहे. 


दरम्यान, 8 ऑगस्ट रोजी देखील केंद्र संकराने अशीच कारवाई केली होती. यात 7 भारतीय आणि 1 पाकिस्तान-आधारित YouTube न्यूज चॅनेल्स ब्लॉक करण्यात आले होते. या ब्लॉक करण्यात आलेल्या चॅनलमध्ये लोकतंत्र टीव्ही, U&V TV, AM रझवी, गौरवशाली पवन मिथिलांचल, SeeTop5TH, सरकारी अपडेट, सब कुछ देखो, न्यूज की दुनिया हे पाकिस्तान आधारित चॅनलचा समावेश आहे. सुमारे 85 लाख युजर्सने हे चॅनेलसबस्क्राईब केलं होत. सबस्क्रिप्शन घेतले होते. याशिवाय एक फेसबुक अकाउंट आणि दोन फेसबुक पोस्ट ब्लॉक करण्यात आले होते. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


भारतातील पहिल्या चावी आँकोलॉजी इमेज बँकेची स्थापना, कॅन्सरवरील संशोधनाला मिळणार चालना 


PM Modi Japan Visit: पंतप्रधान मोदी जपान दौऱ्यासाठी रवाना, शिंजो आबे यांच्या अंत्यसंस्काराला राहणार उपस्थित