Sandipan Bhumre On Shiv Sena: शिवसेना आणि शिंदे गटातील नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून या दोन्ही गटातील वाद आता विकोपाला गेला आहे. त्यातच आता औरंगाबादच्या पालकमंत्री पदावर वर्णी लागताच रोहयो मंत्री संदिपान भुमरे यांनी शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावर निशाणा साधला आहे. 'आता फक्त मैदानात या दाखवतो' असा इशाराच भुमरे यांनी खैरे आणि दानवे यांना दिला आहे. पालकमंत्री झालेले भुमरे आज पैठणच्या पाचोड येथे आयोजित सत्काराच्या कार्यक्रमात बोलत होते. 


भुमरे याचं बिन टाक्याचं ऑपरेशन जनता करणार असल्याची टीका अंबादास दानवे यांनी केली होती. याच टीकेला उत्तर देताना भुमरे म्हणाले की, 2024 ला पाहू कोण कुणाचं ऑपरेशन करतो. फक्त मैदानात या तुम्ही, खैरे असो की दानवे असो फक्त मैदानात या तुम्ही...यांनी अजून मैदानाच पाहिले नाही कारण हे पाठीमागून आलेले आहेत. यांना काय माहित आहे ऑपरेशन, याचं शिंदेंनी एवढं मोठं  ऑपरेशन केले तरीही यांना कळाले नसल्याची टीका भुमरे यांनी केली. 


खरे गद्दार तर उद्धव ठाकरे...


यावेळी भुमरे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सुद्धा टीका केली आहे. हे आम्हाला गद्दार म्हणतात. पण विधानसभा निवडणूकीत लोकांनी आपल्याला भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार म्हणून निवडून दिले. मात्र यांनी राष्ट्रवादी-काँग्रेस सोबत सत्ता स्थापन केली. त्यामुळे खरे गद्दार तर तुम्ही आहेत अशी टीका भुमरे यांनी केली.तर उद्धव ठाकरे फक्त ऑनलाईन आल्यावरच आम्हाला दिसायचे, त्यांनी कधी बाहेर पडून कुठला दौरा केला का?,त्यांनी आम्हाला कधी वेळ दिला का? पण आता त्यांना कार्यकर्ते दिसू लागले, असेही भुमरे म्हणाले. 


खैरेंनी औरंगाबादचं वाटूळ केलं...


औरंगाबाद जिल्ह्याचे खासदार असतांना खैरे यांनी काय केलं, त्यांनी फक्त देवपूजा केली. दहा वर्षे खासदार असतांना खैरे यांनी पैठण तालुक्यातील जनतेला काहीच दिलं नाही. खैरे यांनी औरंगाबाद जिल्ह्याचे वाटूळ केलं. आज औरंगाबाद शहराला पिण्यासाठी पाणी मिळत नाही त्याला खैरे जबाबदार असल्याची टीका भुमरे यांनी केली.


महत्वाच्या बातम्या...


Maratha Reservation: अन्यथा परिणाम गंभीर होतील, तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानानंतर विनोद पाटलांचा इशारा


Navratri 2022 Chondhala Devi: आगळीवेगळी प्रथा असलेल्या चौंढाळ्याच्या रेणुका मातेच्या मंदिरात नवरात्रोत्सवाला सुरुवात