Piyush Goyal on Amit Shah : "शरद पवार युपीएचा महत्त्वाचा घटक होते. अमित शाहांवरील केस खोटी होती, अमित शाह आणि तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदींना अडकविण्याचा प्रयत्न झाला होता.  अमित शाह (Amit Shah) आणि नरेंद्र मोदींवर (Narendra Modi)प्रहार करण्याचा प्रयत्न झाला. खोट्या केसमध्ये शरद पवार (Sharad Pawar) देखील त्याचा भाग होते. अमित शाह यांच्याविरोधात षडयंत्र होतं. कोर्टाच्या निर्णयाकडे आपण बघा. पवार साहेबांनी यासंदर्भात माफी मागितली पाहिजे", असं केंद्रीय मंत्री पियुष गोयल (Piyush Goyal) म्हणाले. ते मुंबईत बोलत होते. 


इंडेक्सेशनमध्ये लोकांना लाभच मिळेल असा माझा दावा आहे


पियुष गोयल म्हणाले, इंडेक्सेशनमध्ये लोकांना लाभच मिळेल असा माझा दावा आहे. 80  टक्के लोकांना इन्डेक्सेशन 12.5 टक्क्यांवर आल्याने फायदा होईल. हो मी चार्टर्ड अकाऊंटन्ट म्हणून सांगतोय. टु व्हिलर इंडस्ट्री येत्या काही काळात इलेक्ट्रीकवर शिफ्ट होताना दिसतील. त्यांना इथून पुढे सरकारच्या इन्सेंटिव्हची गरज लागणार नाही. 


पुढे बोलताना पियुष गोयल म्हणाले, औद्योगिक पार्कात सर्वात मोठा पार्क महाराष्ट्रात होणार आहे, वाढवण बंदर देखील महाराष्ट्रात होतंय, ज्यात मोठी रक्कम दिली गेली आहे. माझे मित्र देवेंद्र फडणवीस यांनी देखील गोष्टी ऐकून दाखवल्या आहेत. रेल्वेत सर्वाधिक रक्कम महाराष्ट्राला मिळाली आहे.  काल स्टाॅक मार्केट रेकाॅर्ड हाय होतं. भांडवली बाजार फ्युचर संदर्भात वेध घेत असतं त्यामुळे काल वधारल्याचं देखील दिसला आहे. 


अर्थसंकल्पात सोने आणि चांदीवरील आयात कर कमी केलाय


इंडिया आघाडीतील मुख्यमंत्र्यांनी तर ही संधी गमावली.  किमान राज्यातील प्राधान्य काय आहे यावर चर्चा झाली असती लोकांना कळलं असतं अडचणी काय आहेत.  नीती आयोग देशासाठी आहे, त्यांना फायदा झाला असता. रिसर्चवर देखील मोठा भर दिला गेलाय. इज ऑफ डुईंग बिजनेस आणि बिजनेस रिफॉर्म ॲक्शनवर भर देण्याचा प्रयत्न असणार आहे. अर्थसंकल्पात सोने आणि चांदीवरील आयात कर कमी केलाय. सोबतच, इलेक्ट्रॉनिक्स वरील कस्टम ड्युटी कमी केलीय. ज्यामुळे हे सर्व येत्या काळात स्वस्त होताना दिसतंय. विकसित भारत बनवण्यासाठी हे बजेट महत्त्वाचे आहे, असं गोयल यांनी सांगितलं. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Babajani Durrani on Sharad Pawar : पवार साहेबांना सोडून गेलेले पुन्हा विधानभवनात दिसले नाहीत ; बरं झालं मी शून्य होण्याआधी परत आलो : बाबाजानी दुर्रानी