एक्स्प्लोर

Ajit Pawar and Devendra Fadnavis Meet: मुलगा पार्थवर जमीन घोटाळ्याचे आरोप, अजितदादा तातडीने वर्षावर पोहोचले; अजित पवार-देवेंद्र फडणवीसांमध्ये चर्चा झाली?, महत्वाची माहिती समोर

Ajit Pawar and Devendra Fadnavis Meet: पार्थ पवारांच्या संबंधीत कंपनीवरती मोठे आरोप होत असतानाच फडणवीस आणि पवार यांच्या भेटीला महत्त्व प्राप्त झालं होतं.

Ajit Pawar and Devendra Fadnavis Meet: महाराष्ट्राच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. एकीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ (Parth Pawar) पवार यांच्या अमेडिया कंपनीकडून १,८०० कोटींचे बाजारभाव असणारी जमीन केवळ ३०० कोटींमध्ये खरेदी करण्यात आली. या खरेदी व्यवहारात शासनाची १५२ कोटींची फसवणूक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे खरेदी व्यवहारात केवळ ५०० रुपये मुद्रांक शुल्क भरण्यात आले आहे. या प्रकरणावरून राजकीय वातावरण तापलं आहे, तर या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे निर्देश दिले आहेत, या घडामोडीदरम्यान आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या भेटीसाठी दाखल झाले. अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार (Parth Pawar) यांच्यावर कथित जमीन घोटाळ्याप्रकरणी आरोप झाल्यानंतर या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. या संपूर्ण प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी अशी प्रतिक्रिया याआधी अजित पवारांनी दिली होती. मात्र अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीमध्ये पार्थ पवार प्रकरणाबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.

Parth Pawar Land Scam: अजितदादा फडणवीस यांच्यामध्ये जमीन प्रकरणाबाबत कोणतीही चर्चा नाही

अजित पवार वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यासोबत महिला क्रिकेट टीम अभिनंदन करून लगेच गेले. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये पार्थ पवार प्रकरणाबाबत कोणतीही चर्चा नाही अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून देण्यात आलेली आहे. एकीकडे पार्थ पवारांच्या संबंधीत कंपनीवरती मोठे आरोप होत असतानाच फडणवीस आणि पवार यांच्या भेटीला महत्त्व प्राप्त झालं होतं, या भेटीमध्ये त्यांच्यात काय चर्चा होते का याकडे लक्ष लागलं होतं, मात्र यावेळी कसलीही चर्चा झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.

Parth Pawar Land Scam: 8 जणांवर या प्रकरणी गुन्हे दाखल

पुण्यातील कोरेगाव पार्क जमीन व्यवहाराप्रकरणी 8 आरोपींवर गुन्हा दाखल झाल्याची माहिती आहे. फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, ही माहिती पुणे पोलीस आयुक्तांनी दिली आहे. शीतल तेजवानी, दिग्विजय पाटील, सूर्यकांत येवले,रवींद्र तारू यांच्यासह 8 जणांवर या प्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत.

Parth Pawar Land Scam: पार्थ पवारांनी दिग्विजय पाटलांना सहीचे अधिकार दिल्याचा ठराव समोर

अमेडिया कंपनीकडून खाजगी एलएलपी आयटी कंपनी उभारली जाणार होती. यासाठी जी खरेदी विक्री केली जाणार होती, त्याच्या सहीचे अधिकार पार्थ पवारांनी दिग्विजय पाटलांना देण्याचा 22 एप्रिल 2025ला प्रस्ताव ठेवण्यात आला. या प्रस्तावाची प्रत आता समोर आलीये. या प्रस्तावानंतर 20 मे 2025ला वादग्रस्त जमिनीचा दस्त झाला. हा दस्त दिग्विजय पाटलांच्या सहीने झाला असून पार्थ पवारांनी सहीचे दिलेल्या अधिकाराची प्रत ही सोबत जोडण्यात आलेली आहे.

Parth Pawar Land Scam: नेमकं प्रकरण काय?

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार (Parth Pawar Land) यांच्या कंपनीशी संबंधित आणखी एक मोठा जमीन व्यवहार वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. पुण्यातील तब्बल 1800 कोटी रुपयांच्या किंमतीची जमीन केवळ 300 कोटी रुपयांत विकण्यात आली, असा आरोप समोर आला आहे. या व्यवहारात गंभीर अनियमितता झाल्याचं उघड होत असून, केवळ 500 रुपयांच्या स्टँप ड्युटीवर व्यवहार नोंदवला गेल्याचेही प्राथमिक तपासात दिसून आले आहे. विरोधकांनी या प्रकरणावरून सरकारवर जोरदार टीका करत रान उठवले आहे.

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Home Loan : घर खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज, 'या' हाऊसिंग फायनान्स कंपनीनं व्याज दर घटवले; स्टेट बँकेनं देखील दिली मोठी अपडेट
घर खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज, 'या' हाऊसिंग फायनान्स कंपनीनं व्याज दर घटवले, SBI कडूनही मोठी अपडेट
Election Rules Maharashtra : EVM वर आधी राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार, नंतर प्रादेशिक पक्ष अन् शेवटी अपक्ष; जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या नियमात मोठा बदल
EVM वर आधी राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार, नंतर प्रादेशिक पक्ष अन् शेवटी अपक्ष; जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या नियमात मोठा बदल
भाजपने तिकीट नाकारलं, घरही नसलेला जांभा अपक्ष लढला; मंत्री संजय राठोडांच्या खास माणसाला पाडला
भाजपने तिकीट नाकारलं, घरही नसलेला जांभा अपक्ष लढला; मंत्री संजय राठोडांच्या खास माणसाला पाडला
संभोग करताना घरात रंगेहाथ सापडले, बायकोचे दोन बाॅयफ्रेंड एकाचवेळी आले, तिघांनी नवऱ्याचं हातोड्यानं डोकं फोडलं, हात पाय तोडून मिक्सरमध्ये तुकडे, डोकं नदीत फेकलं
संभोग करताना घरात रंगेहाथ सापडले, बायकोचे दोन बाॅयफ्रेंड एकाचवेळी आले, तिघांनी नवऱ्याचं हातोड्यानं डोकं फोडलं, हात पाय तोडून मिक्सरमध्ये तुकडे, डोकं नदीत फेकलं
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Elon Musk : श्रीमंतीचा नंबर, मस्कच 'एक' नंबर; मस्क यांची एकूण संपत्ती किती? Special Report
Sikh procession in New Zealand : न्यूझीलंडमध्ये वारी शीखांची, मुजोरी स्थानिकांची Special Report
Manikrao Kokate : आमदारकीचा दिलासा किंचित पण अधिकारांपासून वंचित Special Report
Nashik NCP BJP Alliance : नाशिकमधल्या रस्त्यावरचा 'राजकीय पिक्चर' पाहिला? Special Report
Thackeray Brother Yuti : उद्याचा मुहूर्त, साधणार की हुकणार?  युतीची घोषणा करणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Home Loan : घर खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज, 'या' हाऊसिंग फायनान्स कंपनीनं व्याज दर घटवले; स्टेट बँकेनं देखील दिली मोठी अपडेट
घर खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज, 'या' हाऊसिंग फायनान्स कंपनीनं व्याज दर घटवले, SBI कडूनही मोठी अपडेट
Election Rules Maharashtra : EVM वर आधी राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार, नंतर प्रादेशिक पक्ष अन् शेवटी अपक्ष; जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या नियमात मोठा बदल
EVM वर आधी राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार, नंतर प्रादेशिक पक्ष अन् शेवटी अपक्ष; जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या नियमात मोठा बदल
भाजपने तिकीट नाकारलं, घरही नसलेला जांभा अपक्ष लढला; मंत्री संजय राठोडांच्या खास माणसाला पाडला
भाजपने तिकीट नाकारलं, घरही नसलेला जांभा अपक्ष लढला; मंत्री संजय राठोडांच्या खास माणसाला पाडला
संभोग करताना घरात रंगेहाथ सापडले, बायकोचे दोन बाॅयफ्रेंड एकाचवेळी आले, तिघांनी नवऱ्याचं हातोड्यानं डोकं फोडलं, हात पाय तोडून मिक्सरमध्ये तुकडे, डोकं नदीत फेकलं
संभोग करताना घरात रंगेहाथ सापडले, बायकोचे दोन बाॅयफ्रेंड एकाचवेळी आले, तिघांनी नवऱ्याचं हातोड्यानं डोकं फोडलं, हात पाय तोडून मिक्सरमध्ये तुकडे, डोकं नदीत फेकलं
BMC Election : मनसे-ठाकरेंच्या शिवसेनेचं जमलं, मुंबई जिंकण्यासाठी ठाकरे बंधू सज्ज, जोरदार शक्तिप्रदर्शन करणार
मनसे-ठाकरेंच्या शिवसेनेचं जमलं, मुंबई जिंकण्यासाठी ठाकरे बंधू सज्ज, जोरदार शक्तिप्रदर्शन करणार
राज्यातील तीन आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; ठाणेकन्या डॉ.कश्मीरा संखेंना नाशिकमध्ये खास जबाबदारी
राज्यातील तीन आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; ठाणेकन्या डॉ.कश्मीरा संखेंना नाशिकमध्ये खास जबाबदारी
मनोज्वं मारुत्तुल्यवेगम... देवाभाऊ हनुमान भक्तीत लीन; मुख्यमंत्री अर्धा तास कथा ऐकण्यात मंत्रमुग्ध
मनोज्वं मारुत्तुल्यवेगम... देवाभाऊ हनुमान भक्तीत लीन; मुख्यमंत्री अर्धा तास कथा ऐकण्यात मंत्रमुग्ध
अहो आश्चर्यम... कंपनी कर्मचाऱ्यांना देतेय 1.50 कोटींचा फ्लॅट, योजनेचा लाभ कोणाला मिळणार? जाणून घ्या सविस्तर
कंपनी कर्मचाऱ्यांना देतेय 1.50 कोटींचा फ्लॅट, योजनेचा लाभ कोणाला मिळणार? जाणून घ्या सविस्तर
Embed widget