बीड : मी रडून मतदान मागणार नाही, गोपीनाथ मुंडे व्हायची माझी औकात नाही, मला पंकजा मुंडेच (Pankaja Munde) राहू द्या असं भावनिक वक्तव्य बीडच्या भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी केलं. यावेळी भावनिक झालेल्या पंकजा मुंडे यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं. मला बीडमधून उमेदवारी मिळाल्यानंतर प्रितम मुंडेंचं काय असा प्रश्न अनेकांना पडला आहे, पण प्रीतम मुंडे यांची काळजी करू नका, मी तिला नाशिकमधून उभी करेन असं मोठं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलंय. बीडमध्ये लोकसभेच्या प्रचारासाठी आयोजित सभेमध्ये त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
प्रितम मुंडेंना मी विस्थापित करणार नाही, तिचं कुठेही अडणार नाही, मी तिला नाशिकमधून उभी करेन असं पंकजा मुंडे म्हणाल्या. प्रितम मुंडेंचं राजकारण हे गोपीनाथ मुंडेंच्या पश्चात झालं आहे, मी तर गोपीनाथ मुंडेंचा हात बनले होते असंही त्या म्हणाल्या.
मी प्रितम मुंडेंसाठी तिकीट मागत होते, पण मलाच तिकीट घ्या असं वारंवार सांगितलं गेलं. त्याचं कारण आता मला समजलं, ही देशाची निवडणूक आहे असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
पाहा व्हिडीओ :
काय म्हणाल्या पंकजा मुंडे?
समोर पौर्णिमा चां चंद्र दिसत आहे. काळे ढग बाजूला गेल्यावर चंद्र प्रकाशला गेला. आपल्या जिल्ह्यावरील काळे ढग बाजूला सारा. या बीड जिल्ह्याच्या राजकारणाला कुणाची दृष्ट लागली ते मला माहित नाही. मी एकदा पराभव बघितला आहे. ईश्वरसुद्धा अग्नी परीक्षा घेतो. पाच वर्ष तावून सुलाखून गेले. मी रडून मतदान मागणार नाही. मी म्हणजे गोपीनाथ मुंडे म्हणणार नाही. मला पंकजा मुंडेच राहू द्या. 4 तारखेचा तो अधुरा राहिलेला किस्सा पूर्ण करायचा आहे.
आम्ही जात-पात आणि धर्म पाहिला नाही
राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे म्हणाले की, "ही देशाची निवडणूक आहे. बीड जिल्ह्याने ब्राह्मण समाजाचे खासदार दिल्लीला पाठवला, धनगर समाजाचा खासदार या जिल्ह्याने दिला. क्रांतिसिंह नाना पाटील यांना या जिल्ह्याने खासदार म्हणून पाठवले. केशरबाई क्षीरसागर, जयसिंग गायकवाड यांना खासदार बनवले. आम्ही कधीही जात-पात धर्माचे राजकारण केले नाही. बजरंग सोनवणे यांनी कुणबी म्हणून प्रमाणपत्र काढले. त्यानंतर इतर मागासवर्गीय म्हणून निवडणूक लढली. गेल्या 20 वर्षात आरक्षणावर एकही भाषण केले नाही. मतदान जरी 13 तारखेला असलं तरी निकाल 4 जूनला आहे आणि 3 जूनला मुंडे साहेबाची पुण्यतिथी आहे. मुंडे साहेबांना श्रद्धांजली अर्पण करायची असेल तर पंकजा मुंडेंना निवडून द्या."
ही बातमी वाचा: