बीड :  भाजपच्या (BJP)  बीडमधील लोकसभा उमेदवार (Beed Lok Sabha)  पंकजा मुंडेंनी (Pankaja Munde)  आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत भाऊ धनंजय मुंडे आणि इतर स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. मात्र राज्य पातळीवरचा एकही बडा नेता अर्ज भरतेवेळी उपस्थित नव्हता. अर्ज भरण्यापूर्वी पंकजा मुंडेंनी घरी पूजा केली. त्यानंतर आईचे आशीर्वाद घेतल्यानंतर मुंडे भगिनींनी वैद्यनाथ ज्योतिर्लिंगांची विधीवत दर्शन घेतलं. तसंच गोपीनाथ गडावर जाऊन, गोपीनाथ मुंडेंच्या समाधीपुढे त्या नतमस्तक झाल्या. अर्ज भरल्यानंतर पंकजांनी मोठी रॅली काढत शक्तिप्रदर्शन केलं. बीडमध्ये पंकजा यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बजरंग सोनवणे निवडणूक लढवत आहे. 


पंकजा मुंडेंचा फॉर्म भरताना त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा आर्यमन देखील उपस्थित होता. आर्यमनसहसा राजकीय कार्यक्रमांमध्ये दिसत नाहीत. मात्र आईसोबत आज प्रथमच दिसल्याने लक्ष वेधले. या विषयी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या,   तो नेहमीच माझ्यासोबत असतो. तो मला सरप्राईज देण्यासाठी आला आहे. 


लोकांनी फक्त योग्य प्रवाहात उडी घ्यावी म्हणजे जिल्ह्याचा विकास होईल: पंकजा मुंडे


पंकजा मुंडे म्हणाल्या,  जनतेचे आशिर्वाद घ्यायचे.. त्यांचे पाय पकडायचे त्यांच्यासमोर नतमस्तक व्हायचे हाच माझा प्रचार आहे. गेली अनेक वर्षे लोकांनी माझे काम पाहिले आहे. माझी काम करण्याची पद्धत देखील पाहिली आहे. लोकांनी फक्त योग्य प्रवाहात उडी घ्यावी म्हणजे जिल्ह्याचा विकास होईल.  मुंडे साहेब हा फॉर्म भरायचे त्यावेळी मी त्यांच्यासोबत असायचे. प्रचाराची जबाबदारी खांद्यावर घ्यायचे. प्रीतमताई फॉर्म भरायच्या त्यावेळी देखील मी असायचे. आता  स्वत: मी रिंगणात उतरले आहे त्यामुळे माझ्यासाठी हा अनुभव नवा आहे. निवडणुका लढवण्याची ही पहिली वेळ नाही पण लोकसभेची निवडणूक लढवण्याचा पहिला अनुभव आहे.


मुंडे साहेंबाचे स्वप्न पूर्ण करणार : पंकजा मुंडे


फॉर्म भरण्याअगोदर पंकजा मुंडे भावुक झाल्या होत्या. या विषयी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्यास  मला शब्दात हे वर्णन करता येणार नाही. ज्या जागेवर मुंडेसाहेब होते त्या जागेवर जाण्याचा योग लोकांच्या आशिर्वादाने मिळणर आहे. माझा परिवार मोठा आहे. एक दोन व्यक्ती माझा परिवार नाही. प्रत्येक चौकातील, रस्त्यावरील गर्दी माझा परिवार आहे. मी भावनिक यासाठी झाले कारण माझी आई तिथे आली होती.  मुंडे साहेबांची जागा घेतली असे म्हटले तर लहान तोंडी मोठा घास होईल.. पण त्यांची कमी कधी जाणवणार नाही हा प्रयत्न मी केला आहे. त्यांनी जी गोष्टी अपूर्ण राहिली ती पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करत आहे. या जिल्ह्याची सेवा करण्याची संधी मला मतदारांनी द्यावी.


हे ही वाचा :


अखेर चंद्रहार पाटलांनी तलवार म्यानातून उपसली; म्हणाले विशाल पाटील भाजपची बी टीम, पाकीट घेऊन...