Dharashiv: राजन साळवी यांनी उद्धव ठाकरे गटाला रामराम ठोकत शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे राज्यात ऑपरेशन टायगर सुरु असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. यावर आता राज्याचे परिवहन मंत्री  व धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी ऑपरेशन टायगरसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं लक्ष आहे. ऑपरेशन टायगरची जबाबदारी 12 मंत्र्यांवर असल्याचं सांगत धाराशिवमध्येही त्यांंचे लक्ष असल्याचं सांगितलं आहे. एकीकडे ऑपरेशन टायगरवरून धाराशिवमध्ये ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर शिंदे गटात जाणार का? असा सवाल केला जात असताना शिवसेना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत ऑपरेशन टायगरची खिल्ली उडवली जातेय. दुसरीकडे धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी ऑपरेशन टायगरची मोहीम एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली असल्याचे सांगत धाराशिवमध्येही त्यांचे लक्ष असल्याचं सांगितल्यानं चर्चा रंगल्या आहेत.


काय म्हणाले प्रताप सरनाईक?


धाराशिवमध्ये ऑपरेशन टायगरसाठी एकनाथ शिंदेंचे लक्ष आहे. ऑपरेशन टायगरची जबाबदारी बारा मंत्र्यांवर आहे. धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. एकनाथ शिंदे यांच्या  मार्गदर्शनाखाली ऑपरेशन टायगर मोहीम सुरू असल्याचं प्रताप सरनाईक यांनी सांगितलं .धाराशिवमध्ये पालकमंत्री प्रताप सरनाईक ऑपरेशन टायगर मोहीम राबवतील असं तुळजापूर दौऱ्यावर असताना मंत्री भरत गोगावले यांनी केला होत वक्तव्य केलं होतं. भरत गोगावले यांच्या वक्तव्यावर बोलताना, ऑपरेशन टायगरची मोहीम एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली असल्याचे सांगत धाराशिवमध्येही त्यांचे लक्ष असल्याचं प्रताप सरनाईक म्हणाले. 


आमदार खासदारांनी एसटीने कधीतरी प्रवास करायला हवा,म्हणजे विधानसभा लोकसभेत त्यांना खरीखुरी समस्या मांडता येईल असं म्हणत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटीतून प्रवास केल्याचं सांगितलं. एसी केबिनमध्ये बसून एसटीच्या समस्या कळणार नाहीत.'एसटी' तिथे एसटी हे माझं घोषवाक्य, आदिवासी पाड्यापर्यंत एसटीची सुविधा पोहोचवण्याचा निर्धार केल्याचंही ते म्हणाले.  धाराशिव जिल्हा दौऱ्यावर आलेल्या परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सोलापूर ते धाराशिव एसटी प्रवास केला. मंत्र्यांना एसटीत जशा सुविधा मिळतात तशाच सुविधा प्रवाशांना मिळाव्या म्हणून एसटीने प्रवास केल्याचं सरनाईक यांनी सांगितलं . गेल्याच महिन्यात एसटी महामंडळाने बस दरात 15 टक्के भाडेवाढ करत ही भाडेवढ गरजेचं असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. सरकार नव्या बस घेत असून महामंडळाच्या आर्थिक स्थितीकडे लक्ष केंद्रीत करत ही भाडेवाढ महत्त्वाची असल्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी म्हटले होते. या भाडेवाढीवरून सामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री बसत असल्याचे सांगत विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला होता.


 



हेही वाचा:


Bharat Gogawale : कोणत्याही गोष्टीला लिमीट असते...धनंजय मुंडेंबाबत गोगावलेचं मोठं वक्तव्य