Nagpur Congress : राज्यसभेच्या मतदानाबाबत आज सायंकाळी महाविकास आघाडीच्या आमदारांची मुंबईत बैठक आहे. त्या बैठकीनंतरच महाविकास आघाडीचा नियोजन निश्चित होईल. महाविकास आघाडीतील सर्व उमेदवारांना निवडून आणण्यासाठी आमचे सर्व आमदार सज्ज आहेत. त्यामुळे आमचे चारही उमेदवार निवडून येतील असा विश्वासही कॉंग्रेसचे माजी शहर अध्यक्ष, आमदार विकास ठाकरे यांनी व्यक्त केले.


आमदारांची दुसरी 'चॉईस' ?


महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांच्या उमेदवारांबाबत आज मुंबईत होणाऱ्या बैठकीत नियोजन निश्चित होणार असला तरी आमदारांची दुसरी 'चॉईस'ही महत्वाची ठरणार आहे. त्यामुळे भाजपही याच्या फिल्डिंगमध्ये लागली आहे. अपक्ष आमदारांचे 'भाव' आता वाढले असले तरी आता आमदारांना दुसऱ्या पसंतीसाठीही अलर्ट करण्यात येणार आहे. यादरम्यान आपल्या आमदारांनी दुसरीकडे संपर्कात राहू नये यासाठी सर्वच पक्ष खबरदारी घेताना दिसत आहे.


तिन्ही पक्ष 'अलर्ट'


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी शिवसेना आमदारांची बैठक घेतली. तसेच आज ते महाविकास आघाडीच्या आमदारांची बैठक घेणार आहेत. संध्याकाळी सहा वाजता हॉटेल ट्रायडेंटमध्ये ही बैठक होईल. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेही आमदारांना मुंबईत बोलावले आहे. आज दोन्ही पक्षांच्या आमदारांची हॉटेल ट्रायडेंटमध्ये वेगवेगळी बैठक होणार आहे. त्यानंतर महाविकास आघाडीची बैठक होणार आहे. याशिवाय भाजपच्या आमदारांना हॉटेल ताज प्रेसिडेंटमध्ये ठेवण्यात येणार आहे. 9 जून रोजी भाजपची ताज हॉटेलमध्ये बैठक होणार असून आमदारांना मतदानाचे प्रशिक्षणही दिले जाणार आहे.


भाजपची एकहाती सत्ता असतानाही कॉंग्रेस टिकवलीः ठाकरे


Nagpur: कॉंग्रेस पक्षाच्या 'एक व्यक्ती एक पद' आणि 'पदाचे पाच वर्ष पूर्ण', या निकषाप्रमाणे मी राजीनामा दिला आहे. मागिल आठ वर्षांपासून नागपूर कॉंग्रेसचा शहर अध्यक्ष होतो. नैतिक जबाबदारी म्हणून मी राजीनामा दिला आहे. नागपुरात भाजपची एकहाती सत्ता असतानाही कॉंग्रेस टिकवली. पुढील कॉंग्रेसचा पुढील शहर अध्यक्ष कोणीही असो मी त्यापेक्षाही जास्त काम करत राहील अशी, ग्वाही कॉंग्रेसचे माजी शहर अध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांनी दिली.


 


वाचा


राज्यसभा निवडणुकीत लहान पक्ष आणि अपक्ष 'किंगमेकर' ठरणार


क्रॉस व्होटिंग केली तरी आमदारकी शाबूत, पण...; जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात


 उद्धव ठाकरेंच्या सभेमुळे Aurangabad चे आमदार उद्या मुंबईत येणार