एक्स्प्लोर

Omraje Nimbalkar On MPSC Protest Pune: MPSC च्या आंदोलनस्थळी येताच विद्यार्थ्यांनी घातलेला गोंधळ; आता मागण्या पूर्ण होताच ओमराजे निंबाळकर म्हणाले...

Omraje Nimbalkar On MPSC Protest Pune: एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतल्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

Omraje Nimbalkar On MPSC Protest Pune: पुण्यातील एमपीएससी (MPSC Protest Pune) विद्यार्थ्यांचे 12 दिवसांपासून सुरू असलेले आंदोलन काल (12 ऑक्टोबर 2026) मध्यरात्री दीड वाजता राज्य सरकारच्या मान्यतेनंतर आणि मध्यस्थीनंतर स्थगित करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्यांवर निर्णय झाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं. एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार (Vivek Bhimanwar) यांनी चौकशी पूर्ण होईपर्यंत आपण रजेवर जात असल्याचं ट्विट केलं. त्यानंतर आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतल्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

ओमराजे निंबाळकर काय म्हणाले? (Omraje Nimbalkar On MPSC Protest Pune)

एमपीएससी परीक्षांमधील कथित गैरप्रकारांच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय चौकशी आयोग आणि चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी रजेवर जाण्याचा घेतलेला निर्णय, ही विद्यार्थ्यांच्या विश्वासाच्या दृष्टीने महत्त्वाची पावले आहेत, अशी प्रतिक्रिया शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दिली. तसेच विद्यार्थ्यांच्या मागण्यांची दखल घेऊन शासनाने स्वीकारलेल्या सकारात्मक भूमिकेचे स्वागत करतो. आपल्या हक्कांसाठी ठामपणे उभ्या राहिलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या जिद्दीचे आणि एकजुटीचे मनःपूर्वक अभिनंदन...कष्टाने अभ्यास करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला पारदर्शक परीक्षा प्रक्रिया आणि गुणवत्तेनुसार संधी मिळाली पाहिजे. शासनाचा घटक म्हणून विद्यार्थीहिताच्या निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, हीच माझी भूमिका आहे, असं ओमराजे निंबाळकरांनी सांगितले. 

ओमराजेंनी आंदोलनस्थळी भेट देऊन दिला होता पाठिंबा- (MPSC Protest Pune Marathi News)

ओमराजे निंबाळकर यांनी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलना भेट देऊन पाठींबा दिला होता. मात्र ओमराजे निंबाळकर येताच काही विद्यार्थ्यांनी ओमराजेंची हुर्रे उडवली. अनेक विद्यार्थ्यांनी हुल्लडबाजी केली, गोंधळ घातला होता. ओमराजे निंबाळकर भाषणाला उभे राहताच काही आंदोलकांनी पक्षांतरचा मुद्दा उपस्थित केला. त्याला उत्तर देताना ओमराजे म्हणाले की, ओमराजे असाच ओमराजे झाला नाही. खालून धडका घेऊन इथपर्यंत आलोय. इथे बसलेले विद्यार्थी मला पक्षांतराविषयी बोलले. मी 24 तास मतदारसंघात खपतोय, लोकांची कामं करतोय. सर्वसामान्य माणसाची साथ सोडली नाही. त्या मतदारसंघात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक झाली. पण आमचा एकही उमेदवार निवडून आला नाही, ही वस्तुस्थिती आहे. म्हणून मी पक्षांतराचा निर्णय घेतला, असं ओमराजेंनी स्पष्ट केलं होतं. 

विद्यार्थ्यांच्या कोणकोणत्या प्रमुख मागण्या मान्य? (Which mpsc students demands have been accepted?)

  • आंदोलकांचा राजीनाम्यासाठी आग्रह,पण सरकारनं चौकशी समिती नेमली
  • चौकशी होईपर्यंत अध्यक्ष भीमनवार सक्तीच्या रजेवर
  • भीमनवार यांच्या चौकशीसाठी पाच सदस्यीय समितीस दोन महिन्यांचा वेळ
  • दिलीप भोसले चौकशी समितीचे अध्यक्ष, तुकाराम मुंडेही समितीवर
  • एमपीएससीतील आजी-माजी अध्यक्षांपासून शिपायांपर्यंतच्या अधिकाऱ्यांची चौकशी होणार
  • आंदोलकांवरील गुन्ह मागे घेण्याचं आश्वासन 
  • तीन वर्षात 70 हजार रिक्त पदे भरु असं आश्वासन
  • 2027 मध्ये होणाऱ्या गट क च्या पदांमध्ये वाढ करणार
  • मागण्या मान्य करत असलेल्या पत्रावर मुख्य सचिवांची सही
  • तहसिलदार भरतीत 60-40 ऐवजी 50-50 चा रेश्यो
  • आयोगाची सदस्य संख्या 11 पर्यंत वाढवली जाणार
  • एमपीएससीच्या सर्व परीक्षा ऑफलाईन पद्धतीनंच होणार
  • पोलीस भरतीसाठी एकच अभ्यासक्रम ठेवण्याचेही मान्य

रोहित पवार काय काय म्हणाले? (Rohit Pawar On MPSC Protest Pune)

महात्मा गांधी यांच्या सत्याग्रहाच्या मार्गाने गेल्या अकरा दिवसांपासून पुण्यात सुरु असलेल्या MPSC च्या विद्यार्थ्यांच्या लढ्याला अखेर यश आलं. राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी सत्याग्रहाला भेट देऊन आंदोलकांशी यशस्वी चर्चा केली आणि 2021 पासूनच्या सगळ्या पेपरफुटीच्या चौकशीसाठी न्या. दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली 1952 च्या चौकशी कायद्यानुसार न्यायालयीन चौकशी आयोगाची स्थापना केली. विशेष म्हणजे आयोगाच्या सचिवपदी स्वच्छ प्रतिमेचे आणि धडाडीचे सनदी अधिकारी मा. तुकाराम मुंडे साहेब यांची नेमणूक करण्यात आली. यामध्ये न्या. पी. डी. नाईक, पोलीस अधिकारी लखमी गौतम, सेवानिवृत्त अधिकारी गणेश पाटील यांचाही समावेश आहे. ही चौकशी पारदर्शक पद्धतीने व्हावी यासाठी विद्यार्थ्यांच्या दबावामुळं MPSC अध्यक्ष भिमनवार यांनी रजेवर जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळं येत्या दोन महिन्यात चौकशीच्या माध्यमातून ‘दूध का दूध और पाणी का पाणी’ होऊन आयोगातील सर्वच आजी-माजी भ्रष्ट अध्यक्ष, सदस्य आणि अधिकारी या सर्वांचाच खरा चेहरा पुढं येईल, असं रोहित पवार म्हणाले. महत्त्वाचं म्हणजे यापुढील सर्व परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच घेण्याचा, राजस्थानच्या धर्तीवर 100 रुपयांच्या कार्डवर वर्षभरातील सर्व परीक्षा घेण्याचा, वेळेत निकाल, प्रतिक्षा यादी लावणं, रिक्त जागा भरणं, जागांमध्ये वाढ यासह विद्यार्थ्यांच्या इतर 14 मागण्याही सरकारने मान्य केल्या. तसंच विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे घेण्याचं आणि विद्यार्थी, क्लासचालक व टेलिग्राम चॅनल चालक यांना दिलेल्या नोटीसाही मागे घेण्याचं सरकारने मान्य केलं. हा विद्यार्थ्यांच्या ऐतिहासिक एकजुटीचा विजय आहे. याबाबत सत्याग्रह सुरु असताना उपोषणाला बसलेले आणि गेली अकरा दिवस रस्त्यावर संघर्ष करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून अभिनंदन! विद्यार्थी सत्याग्रहाची सांगता अशा प्रकारे गोड होताच पुण्यातील एस. एम. जोशी पुलावरील आंदोलनस्थळी असलेल्या हजारो विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला… हा जल्लोष आणि हा आनंद शब्दांच्या पलिकडे होता, यातूनच विद्यार्थी या भ्रष्ट व्यवस्थेला किती वैतागले आहेत, हेच स्पष्ट होतं, अशी प्रतिक्रिया रोहित पवारांनी दिली.

आंदोलनाचा एक भाग होण्याची संधी विद्यार्थ्यांनी दिल्याने मनापासून आभार- (MPSC Protest Pune Marathi News)

विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिलेले सर्वपक्षीय नेते मंडळी, शरद पवार, सुप्रिया सुळे, सर्वपक्षीय पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, विविध संस्था-संघटनांचे पदाधिकारी, सोशल मिडिया इन्फ्ल्युएन्सर, माध्यमांचे प्रतिनिधी, सोशल मिडियात व्यक्त होणारी मंडळी यांच्यासह या आंदोलनातील सर्व संयोजक, त्यांचे सर्व सहकारी, क्लास चालक या सर्वांनी दिलेल्या पाठबळाचं हे यश आहे. याबाबत या सर्वांचे आभार...सरकारचा दबाव असतानाही सहकार्याची भूमिका घेतलेले पोलिस प्रशासन तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि सरकारचे प्रतिनिधी म्हणून आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलनातून यशस्वी मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करणारे मंत्री शिवेंद्रराजे भोसले साहेब यांचेही आभार...आंदोलनादरम्यान, सामाजिक दायित्त्वाच्या भावनेतून विद्यार्थ्यांच्या जेवणाची काळजी घेणाऱ्या सर्व ज्ञात-अज्ञात मंडळींचेही मनापासून आभार..आता सरकारने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे चौकशी आयोगाकडून वेळेत निष्पक्ष पद्धतीने चौकशी होईल आणि MPSC सारख्या महत्त्वाच्या संस्थेला लागलेली भ्रष्टाचाराची कीड मुळासकट काढून या संस्थेला पुन्हा पुनर्वेभव प्राप्त होईल आणि या संस्थेच्या माध्यमातून राज्याला गुणवत्ता असलेले प्रामाणिक अधिकारी मिळतील, असा विश्वास आहे. या आंदोलनाचा एक भाग होण्याची संधी विद्यार्थ्यांनी विश्वासाने दिली याबाबत त्यांचे मनापासून आभार, असंही रोहित पवार म्हणाले. 

संबंधित बातम्या:

Vivek Bhimanwar MPSC Protest Pune: 12 दिवस आंदोलन, अखेर सक्तीच्या रजेवर...; MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Rohit Pawar MPSC Protest Pune: आंदोलन मागे घेण्याबाबत रोहित पवार आग्रही, पण विद्यार्थी ऐकेनात, आंदोलनस्थळी पेच; मध्यरात्री 1.24 वाजता काय घडलं?

मुकेश अजित चव्हाण, हे मुळेचे दक्षिण मुंबईकर असून डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात सुमारे ९ वर्षांचा अनुभव असलेले पत्रकार असून, सध्या ABP माझा डिजिटल विभागात कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र टाइम्समधून त्यांनी आपल्या ऑनलाइन पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर लोकमतमध्ये सुमारे ५ वर्षे सीनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करताना त्यांनी डिजिटल न्यूज क्षेत्रातील अनुभव आणि कौशल्य अधिक विकसित केले. गेल्या ३ वर्षांपासून ते ABP माझाच्या डिजिटल विभागात कार्यरत आहेत.

मुंबईतील माटुंगा येथील रुईया महाविद्यालयातून त्यांनी पत्रकारितेची पदवी प्राप्त केली आहे. राजकीय, गुन्हेगारी आणि क्रीडा विषयक बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. एखादी महत्त्वाची घटना किंवा विशेष कार्यक्रम घडल्यास त्याचे विविध पैलू, वेगवेगळे दृष्टिकोन आणि बातमीमूल्य लक्षात घेऊन आशयपूर्ण व प्रभावी बातम्या तयार करण्यावर त्यांचा भर असतो.

देश-विदेशातील घडामोडींवर लक्ष ठेवणे, महत्त्वाच्या बातम्यांचे संपादन करणे, बातम्यांचे विविध अँगल शोधणे तसेच सकाळच्या शिफ्टची जबाबदारी सांभाळणे, अशा विविध जबाबदाऱ्या ते पार पाडतात. वेगवान डिजिटल पत्रकारितेत बातम्यांची अचूकता, सादरीकरण, वेळेचे व्यवस्थापन आणि वाचकांपर्यंत महत्त्वाची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर आहे.

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

माझा भाऊ मंत्री होऊ दे, भाऊबीजनिमित्त सुषमा अंधारेंच्या धनंजय मुंडेंना शुभेच्छा, म्हणाल्या, परळीला सत्ताकेंद्र असण्याची सवय
माझा भाऊ मंत्री होऊ दे, भाऊबीजनिमित्त सुषमा अंधारेंच्या धनंजय मुंडेंना शुभेच्छा, म्हणाल्या, परळीला सत्ताकेंद्र असण्याची सवय
अजित पवार महायुती सोडणार होते, अतुल लोढेंचं मोठं वक्तव्य, उमेश पाटील म्हणाले दाव्याचा ठोस पुरावा नेमका काय? 
अजित पवार महायुती सोडणार होते, अतुल लोढेंचं मोठं वक्तव्य, उमेश पाटील म्हणाले दाव्याचा ठोस पुरावा नेमका काय? 
बहीण अमृता फडणवीसांनी भाऊबीजेला बोलावलं का? मनोज जरांगे पाटील म्हणाले तिघींनाही भाऊबीज पाठवणार
बहीण अमृता फडणवीसांनी भाऊबीजेला बोलावलं का? मनोज जरांगे पाटील म्हणाले तिघींनाही भाऊबीज पाठवणार
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा, सुनेत्रा पवारांच्या भेटीनंतर तटकरेंनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा, सुनेत्रा पवारांच्या भेटीनंतर तटकरेंनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Advertisement

व्हिडीओ

Omraje Nimbalkar call : आमच्या गावचा रस्ता कधी करता ? खासदार ओमराजेंना चिमुकल्याचा थेट सवाल
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil:Satej Patil यांच्यावरील टीकेला उत्तर,चंद्रकांत पाटलांवर टीका
Majha Katta Mrudula Dadhe EP 1 : अजरामर गाण्यांमागच्या अफलातून गोष्टी, मृदुला दाढेंसोबत शब्दसुरांची मैफल
Satej Patil PC : धमक्या कुणाला देताय? मी सुद्धा पाटील, ३-३ मंत्र्यांना उत्तर UNCUT PC
Hasan Mushrif speech Gokul : ... ती बंटी पाटलांची शेवटची सभासमजा, 13 संचालकांना इशारा
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
केंद्र सरकारचा मोठा निर्णय, रब्बी हंगामातील खतांसाठी 62370 कोटींचं अनुदान मंजूर, मुद्रा योजनेसाठी 5000 कोटींना मंजुरी
केंद्र सरकारचा मोठा निर्णय, रब्बी हंगामातील खतांसाठी 62370 कोटींचं अनुदान मंजूर
अर्शदीपची समरीनकडून विकेट; टीम इंडियाच्या गोलंदाजाचा फिल्मीस्टाईल प्रपोज, साखरपुड्यानंतर नवी इनिंग
अर्शदीपची समरीनकडून विकेट; टीम इंडियाच्या गोलंदाजाचा फिल्मीस्टाईल प्रपोज, साखरपुड्यानंतर नवी इनिंग
संपत्तीपुढे नात्याचं मोलच नाही; कल्याणमध्ये वडिलांसह सख्ख्या भावावर झाडल्या गोळ्या, मुलगा अटकेत
संपत्तीपुढे नात्याचं मोलच नाही; कल्याणमध्ये वडिलांसह सख्ख्या भावावर झाडल्या गोळ्या, मुलगा अटकेत
Kavya Maran Marriage : काव्या मारन-अनिरुद्ध रविचंदर विवाहबंधनात अडकले, ग्रीसमध्ये विवाहसोहळा संपन्न, लग्नाचे फोटो शेअर करताच शुभेच्छांचा पाऊस
काव्या मारन-अनिरुद्ध रविचंदर विवाहबंधनात अडकले, ग्रीसमध्ये विवाहसोहळा संपन्न, रजनीकांत यांची हजेरी
सुनेत्रा पवारांची शेतकऱ्याच्या घरी दिवाळी; पिठलं-भाकर खाऊन साधला संवाद, पाणी काटकसरीने वापरण्याचा दिला सल्ला
सुनेत्रा पवारांची शेतकऱ्याच्या घरी दिवाळी; पिठलं-भाकर खाऊन साधला संवाद, पाणी काटकसरीने वापरण्याचा दिला सल्ला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 नोव्हेबर 2026 | बुधवार
Gold Rate : भाऊबीजेच्या दिवशी सोनं महागलं की स्वस्त झालं? 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे IBJA चे दर जाणून घ्या
भाऊबीजेच्या दिवशी सोनं महागलं की स्वस्त झालं? 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
मोठी बातमी, महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा! लाडघर, गुहागर आणि श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय ‘ब्ल्यू फ्लॅग’ पुरस्कार
महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा! लाडघर, गुहागर आणि श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय ‘ब्ल्यू फ्लॅग’ पुरस्कार
Embed widget