Omraje Nimbalkar on Manoj Jarange, परभणी : मराठा आणि ओबीसींमधील आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सुरु असलेला वाद मिटेल का? असा प्रश्न विचारण्यात आलेला. याबाबत ठाकरेंच्या शिवसेनेचे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांनी भाष्य केलं आहे. "सर्वांत महत्त्वाचं मराठा आरक्षणाच्या बाबतीत जे वचन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांना दिले होते. त्यानंतर मुंबईत गुलालही उधळण्यात आला होता. जे वचन दिलं ते पूर्ण करावं" असं ओमराजे निंबाळकर म्हणाले. ते एबीपी माझाशी बोलत होते. 


ओमराजे निंबाळकर काय काय म्हणाले?


ओमराजे निंबाळकर म्हणाले, निवडणूका लढत असताना प्रत्येक पक्ष आणि संघटना गाव पातळीपर्यंत मजबूत आहे का? हे पाहाण्याचे काम करत असतो. त्याच्याच भाग म्हणून आम्ही सर्व लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतोय. महाविकास आघाडीच्या उमेदवारामागे तिन्ही पक्षांची ताकद उभी राहिलं, त्याचवेळी आमच्या पदरात यश पडेल. प्रत्येक पक्ष मतदारसंघांची पाहणी करतोय. प्रत्येक पक्षाची संघटना, कार्यकर्ते, केडर हे प्रत्येक मतदारसंघात आहे. त्यामुळे प्रत्येक पक्ष केडर आहे का ते पाहातोय. त्यामुळे स्वबळावर लढण्याचा प्रश्न नाही. 


मराठा आरक्षणाचा मुद्दा पूर्ण मराठवाड्यात खासकरुन पेटलेला आहे


पुढे बोलताना ओमराजे निंबाळकर म्हणाले, मराठा आरक्षणाचा मुद्दा पूर्ण मराठवाड्यात खासकरुन पेटलेला आहे. उद्धव ठाकरे साहेबही ज्यावेळी धाराशिवच्या दौऱ्यावर होते. त्यावेळीही मराठा समाजाच्या आंदोलकांनी आणि तरुणांनी उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी विनंती केली होती. त्यावेळी तेही भेटले होते. प्रत्येक पक्षाचा प्रमुख नेता येतो, तेव्हा मराठा आंदोलकांना त्यांना भेटायचं आणि बोलायच असतय. त्यामुळे अमुक पक्षाचा कार्यकर्ता होता, तमुक पक्षाचा कार्यकर्ता होता असं नाही. समाज म्हणून ते त्याठिकाणी होती, असंही ओमराजे निंबाळकर यांनी स्पष्ट केलं. 


संभाजीराजे छत्रपती आणि मनोज जरांगे यांच्याकडून विधानसभेला एकत्र लढण्याच्या हालचाली


येत्या विधानसभा निवडणुकीत स्वराज पक्ष सर्व जागा लढवणार असून महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्याशी संबंध नसणार असल्याचा खुलासा माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांनी आज (दि.14) केला. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्याशी निवडणुकीबाबत राजकीय चर्चा अजून झाली नसली तरी आम्ही ती करणार असल्याचे सांगत या विधानसभेला तिसरी आघाडी करण्याची शक्यता संभाजीराजे यांनी बोलून दाखवली. स्वराज्य पक्षाचे नेते महादेव तळेकर यांनी आज भोसे येथे आयोजित केलेल्या महामंडळ महाएक्स्पो सोहळ्याच्या उदघाटनाला आले असता संभाजीराजे बोलत होते. यावेळी राजरत्न आंबेडकर हे देखील उपस्थित होते. मनोज जरांगे यांचा दृष्टीकोण आणि माझ उद्दिष्ट एक असल्याचे सांगत मनोज जरांगे, संभाजी राजे छत्रपती विधानसभेला एकत्र येणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले. 




इतर महत्वाच्या बातम्या 


Maharashtra Cabinet : फाईल वाचल्याशिवाय मी सही करणार नाही; मंत्रिमंडळ बैठकीत अजित 'दादा'- एकनाथ 'भाई' भिडले