Omprakash Rajenimbalkar Dharashiv, Osmanabad Loksabha : महाविकास आघाडीचे आणि ठाकरे गटाचे धाराशीवचे उमेदवार ओमराजे निंबाळकर (Omprakash Rajenimbalkar) यांच्या उमेदवारी अर्जामध्ये त्रुटी आढळल्या आहेत. ओमराजे यांच्या शिवाय महायुतीच्या आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्याही उमेदवारी अर्जात त्रुटी आहेत. ओमराजे (Omprakash Rajenimbalkar) आणि अर्चना पाटील यांनी आज (दि.16) उमेदवारी अर्ज भरला होता. ओमराजे आणि अर्चना पाटील यांच्या अर्चना पाटील यांच्या एबी फॉर्म आणि मालमत्ता प्रमाणपत्रामध्ये चुका आहेत. शिवाय इतर काही त्रुटीही निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी स्पष्ट केल्या आहेत.
19 एप्रिलपर्यंत त्रुटीची पूर्तता करण्याची दिली नोटीस
ओमराजे निंबाळकर (Omprakash Rajenimbalkar) आणि अर्चना पाटील यांना चूका दुरुस्त करण्यासाठी 19 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. जर 19 एप्रिलपर्यंत त्रुटींची पुर्तता झाली नाही तर, ओमराजे निंबाळकर आणि अर्चना पाटील यांचे अर्ज बाद केले जाणार असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी दोन्ही उमेदवारांना समज दिली आहे.
ओमराजेंचा अर्ज भरण्यासाठी दिग्गजांची उपस्थिती
ओमराजे निंबाळकर (Omprakash Rajenimbalkar) यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी माजी मंत्री आदित्य ठाकरे, आमदार रोहित पवार, माजी मंत्री अमित देशमुख यांनी उपस्थिती लावल होती. मला आज अनेक ठिकाणी लोकांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी बोलावले होते. मात्र, मी फक्त ओमराजे निंबाळकरांसाठी धाराशिवमध्ये आलो आहे. इतर कोणत्याही ठिकाणी गेलो नाही, असं यावेळी आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.
कैलास पाटलांना भोवळ
ओमराजे निंबाळकर (Omprakash Rajenimbalkar) यांनी उमेदवारी अर्ज भरला. मात्र, धाराशिवमध्ये असलेल्या कडक उन्हाचा फटका त्यांचे सहकारी असलेले आमदार कैलास पाटील यांना बसला. उष्माघाताने कैलास पाटील भोवळ येऊन खाली पडलेले पाहायला मिळाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
ओमराजेंचा सामना भावजयशी
ओमराजे निंबाळकर यांच्याविरोधात अजित पवारांच्या राष्ट्रवादीने अर्चना पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे दीर विरुद्ध भावजय असा सामना धाराशिव लोकसभा मतदारसंघात पाहायला मिळणार आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत ओमराजे यांनी राणा जगजितसिंह पाटील यांचा पराभव केला होता. त्यानंतर ठाकरे गटाने पुन्हा एकदा ओमराजेंना मैदानात उतरवले आहे.