जालना :  सगेसोयरे शब्दांमुळे केवळ ओबीसींचेच नाही तर एससी आणि एसटी वर्गाचे आरक्षण सुद्धा जाऊ शकतं अशी टीका ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake)  यांनी केलीये. मनोज जरांगेंमुळे (Manoj Jarange)  मराठा नेत्यांचीही मान खाली जाईल असं ते म्हणाले. तसंच ओबीसी समाजावर अन्याय होताना महाराष्ट्रातील विचारवंत कुठे आहेत असा सवाल त्यांनी केलाय. छगन भुजबळांना (Chhagan Bhujbal)  टार्गेट करुन जरांगे धनगरांचं घर उध्वस्त करायला निघाले आहेत, असे देखील हाके म्हणाले.


विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आज लक्ष्मण हाके यांची भेट घेणार आहेत. वडेट्टीवार आज संध्याकाळी वडीगोद्री इथे जाऊन हाकेंची भेट घेणार आहेत. वडेट्टीवारांनी कालच लक्ष्मण हाके यांच्याशी फोनवरुन संवाद साधला होता. दरम्यान हाकेंच्या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. हाके म्हणाले, मराठा नेत्यांना कळकळीची विनंती आहे.  जरांगेची कृती पुन्हा समोर आली तर तुम्हाला सुद्धा तोंड काळ करावे लागेल आमच्यावर अन्याय होत असताना महाराष्ट्रातले विचारवंत कुठे आहे?  भुजबळ यांना टार्गेट करून जरांगे धनगरांचे घर उद्ध्वस्त करायला निघाले आहेत. सगे सोयरे शब्दांमुळे केवळ ओबीसींचेच नाही तर एससी आणि एसटीचे आरक्षण सुद्धा जाऊ शकते.  


भुजबळांना टार्गेट करून जरांगे धनगरांचे घर उद्ध्वस्त करायला निघाले : लक्ष्मण हाके


 तुम्हाला पैशाचा आणि सत्तेचा माज आहे.  यावेळी हेलिकॉप्टरने पैसे वाटले तरी तुम्हाला ओबीसी  मतदान करणार नाही. धनगर समाजाचे नेते ओबीसीच्या अठरापगड जातीच्या संरक्षणार्थ व्यासपीठावर आहेत. भुजबळांना टार्गेट करून जरांगे धनगरांचे घर उद्ध्वस्त करायला निघाले आहेत.   मराठा नेत्यांना कळकळीची विनंती आहे.  जरांगेची कृती समोर आली तर तुम्हाला सुद्धा तोंड काळ करावा लागेल. खूप गोष्टी आहेत वेळ आल्यावर बोलेल,असे देखील हाके म्हणाले.  


खिरापत वाटल्याप्रमाणे कुणबी सर्टिफिकेट वाटले :लक्ष्मण हाके 


कुणबी नोंदी हा फ्रॉड आहे.  कुणबी दाखले कोणत्या अधिकारात आणि कोणत्या निकषावर दिले हे आम्हाला शासनाने सांगावं. महाराष्ट्रात तुम्ही दहशतीचे वातावरण निर्माण केलं.  तुम्ही बीडमध्ये कोणाची घर आणि कोणाची हॉटेल जाळली आणि तुम्हीच ओबीसी वाद निर्माण करत आहे. ई डब्ल्यू एसमध्ये दहा टक्के पैकी साडेआठ टक्के लाभ फक्त मराठा समाजाला झाला आहे. शिवरायांच्या स्वराज्यासाठी जीवाची कुर्बानी देणारा ओबीसी आहे, त्याच्या अन्नात माती कालवू  नका.  सग्या-सोयऱ्या शब्दामुळे केवळ ओबीसीचे नाही तर एस सी आणि एसटी चे आरक्षण सुद्धा जाऊ शकते. खिरापत वाटल्याप्रमाणे कुणबी सर्टिफिकेट वाटले जात आहे. अन्याय होत असताना महाराष्ट्रातले विचारवंत कुठे आहेत? असा सवाल लक्ष्मण हाके यांनी केला आहे.