Dhairyasheel Mane on Maha Vikas Aaghadi : सांगली : पश्चिम महाराष्ट्रामध्ये (West Maharashtra) मोठमोठे बुरुज ढासळले, मात्र आपण वादळात दिवा लावला, असं वक्तव्य शिंदे गटाचे (Shinde Group) हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे (Hatkanangle Lok Sabha Constituency) नवनिर्वाचित खासदार धैर्यशील माने (MP Dhairyasheel Mane) यांनी केलं आहे. हातकणंगलेची निवडणूक लढवली (Hatkanangle Lok Sabha Result 2024) आणि ती निवडणूक विजयी करूनही दाखवली, असंही खासदार धैर्यशील माने म्हणाले आहेत. दरम्यान, निकालाआधीच गुलाल लावणारे विरोधक निकालानंतर जोतिबाला जाऊन आलोय, असं सांगत होते. हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने यांनी शिराळामधील एका सत्कार सोहळ्यात बोलताना हे वक्तव्य केलं आहे.
शिंदे गटाचे हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार धैर्यशील माने बोलताना म्हणाल्या की, "मतमोजणीच्या दिवशी अशी परिस्थिती होती की, दुपारपर्यंत विरोधक गुलाल लावून फिरत होते. आम्हालाच काही कळेना. अजून काही फेऱ्या बाकी होत्या. मशाल पेटली म्हणून विरोधक सांगत होते आणि संध्याकाळी पाच वाजता पाऊस पडला आणि मशाल विजून गेली. हे सगळ्या महाराष्ट्रानं पाहिलं. जे गुलालात रंगले, ते ज्योतिबाला जाऊन आले, म्हणून बाहेर सांगत होते." तसेच, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आपण हातकलंगले लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवली आणि ती निवडणूक विजयी करून दाखवली, असंही खासदार धैर्यशील माने म्हणाले आहेत.
दरम्यान, धैर्यशील माने यांनी सांगली जिल्ह्यातील शिराळा वाळवा मतदार संघाचा आभार दौऱ्यावेळी मत व्यक्त केलं. शिराळामध्ये आयोजित सत्कार सोहळ्यात खासदार माने बोलत होते. यावेळी शिराळा विधानसभा मतदारसंघाचे सत्यजित देशमुख, सदाभाऊ खोत, सागर खोत वाळवा शिराळा तालुक्यातील प्रतिष्ठित कार्यकर्ते उपस्थित होते.
पाहा व्हिडीओ : Dhairyasheel Mane : पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठ-मोठे बुरूज ढासळले, आपण वादळात दिवा लावला!