Nitish Kumar Meets Rahul Gandhi: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सोमवारी दिल्लीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे पन्नास मिनिटे चर्चा झाली. बिहारमध्ये काँग्रेस समर्थित महाआघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर नितीश कुमार आणि राहुल गांधी यांची ही पहिलीच भेट होती. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेऊन बाहेर आल्यानंतर मुख्यमंत्री नितीश यांनी माध्यमांशी संवाद टाळला.


बिहारमध्ये नवे सरकार स्थापन झाल्यानंतर राहुल गांधी यांनी नितीश कुमार यांचे फोनवरून अभिनंदन केले होते. या दोन्ही नेत्यांची भेट वेळी झाली आहे, जेव्हा रविवारीच राहुल गांधींनी भाजपला पराभूत करण्यासाठी विरोधी पक्षांना एकत्रित येण्याचे आवाहन केले होते. बिहारमध्ये सत्तापरिवर्तन झाल्यानंतर नितीश कुमारही विरोधी पक्षांना एकत्रित येण्याचे आवाहन करत आहे. दिल्लीत पोहोचल्यानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले की, त्यांना पंतप्रधान होण्याची इच्छा नाही. दिल्ली दौऱ्यावर असताना पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री नितीश म्हणाले की, मला पंतप्रधान होण्याची इच्छा नाही. विरोधी पक्षांनी एकत्र येऊन भाजपविरोधात लढा द्यावा, एवढीच माझी इच्छा आहे.


दिल्लीला जाण्यापूर्वी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राष्ट्रीय जनता दल (RJD) प्रमुख लालू प्रसाद यादव यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. यावेळी बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आणि राबडी देवी तेथे उपस्थित होत्या. नितीश कुमार यांच्या दिल्ली दौऱ्याबाबत उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव म्हणाले की, 'आज मुख्यमंत्र्यांचा दिल्ली दौरा आहे. ते आमच्या महाआघाडीचे भागीदार असलेल्या अनेक नेत्यांना भेटतील. देशाच्या विरोधकांना एकजूट दाखवावी लागेल, असे नितीश कुमार यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.'


दरम्यान, लोक जनशक्ती पक्षाचे (रामविलास) नेते चिराग पासवान यांनी नितीश कुमार यांच्या दिल्ली दौऱ्यावर निशाणा साधला आहे. चिराग पासवान यांनी नाव न घेता ट्वीट करत म्हटलं आहे की, "ऐकले आहे की, जाब विचारल्यावर लाठ्यांचा वर्षाव करणारा मुख्यमंत्री 3 दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहे. बिहारमध्ये विकास करण्याऐवजी ते विरोधी पक्षांना एकत्रित करण्यात गुंतले आहेत. याचदरम्यान नितीश कुमार हे पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नसल्याचे जेडीयूच्या बाजूने आधीच स्पष्ट करण्यात आले आहे. जेडीयू नेते उपेंद्र कुशवाह यांनीही एबीपी न्यूजशी बोलताना मुख्यमंत्री नितीश पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नसल्याचे सांगितले.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Bangladesh PM Delhi Visit: शेख हसीना चार दिवसांच्या दौऱ्यासाठी भारतात पोहोचल्या, एस जयशंकर यांची घेतली भेट
Car Seat Belt: कारच्या मागच्या सीटवर बसतानाही सीटबेल्ट लावणार, आनंद महिंद्रा यांनी केला संकल्प