Bangladesh PM Delhi Visit: बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना (Sheikh Hasina) चार दिवसांच्या दौऱ्यावर सोमवारी दिल्लीत दाखल झाल्या. भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर  (S Jaishankar) यांनी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांची दिल्लीत भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. शेख हसीना मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi)  यांची भेट घेणार आहेत. दोन्ही नेते संरक्षण, व्यापार आणि नदी-पाणी वाटपाच्या क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी उपाययोजनांची रुपरेषेवर चर्चा करू शकतात. 


पंतप्रधान शेख हसीना भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांचीही भेट घेणार आहेत. तत्पूर्वी शेख हसीना या ऑक्टोबर 2019 भारत भेटीवर आले होते. सोमवारी नवी दिल्ली येथे पोहोचल्यानंतर केंद्रीय मंत्री दर्शना जरदोश यांनी बांगलादेशच्या पंतप्रधानांचे विमानतळावर स्वागत केले. गुरुवारी आपल्या भेटीदरम्यान शेख हसीना राजस्थानमधील अजमेर येथील सुफी संत मोईनुद्दीन चिश्ती यांच्या दर्ग्यालाही भेट देणार आहेत.


भारतात आल्यावर परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी ट्वीट केले की, "बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचे नवी दिल्ली येथे आगमन होताच रेल्वे आणि वस्त्रोद्योग राज्यमंत्री दर्शन जरदोश यांनी त्यांचे स्वागत केले. त्यांचा हा दौऱ्यामुळे दोन्ही देशांचे संबंध अधिक दृढ होतील." याचदरम्यान भारतीय उद्योग महासंघद्वारे (CII) आयोजित व्यवसाय कार्यक्रमात पंतप्रधान शेख हसीना देखील सहभागी होणार आहेत.






याशिवाय 1971 मध्ये बांगलादेशच्या मुक्तिसंग्रामात शहीद झालेल्या आणि गंभीर जखमी झालेल्या भारतीय सशस्त्र दलाच्या 200 जवानांच्या वंशजांना शेख हसीना बांगलादेश सरकारकडून मुजीब शिष्यवृत्तीही देणार आहेत. शेख हसिना यांच्या शिष्टमंडळात परराष्ट्र मंत्री एके अब्दुल मोमेन, वाणिज्य मंत्री टिपू मुन्शी, रेल्वे मंत्री मोहम्मद नुरुल इस्लाम सुजान, मंत्री एकेएम मोझम्मेल हक आणि पंतप्रधानांचे आर्थिक व्यवहार सल्लागार मशिउर एकेएम रहमान यांचा समावेश आहे.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Car Seat Belt: कारच्या मागच्या सीटवर बसतानाही सीटबेल्ट लावणार, आनंद महिंद्रा यांनी केला संकल्प
Hemant Soren : झारखंड विधानसभेत हेमंत सोरेन यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला; भाजपचा सभात्याग