Arvind Kejriwal And Nitish Kumar Meeting: बिहारचे (Bihar) मुख्यमंत्री नितीश कुमार Nitish Kumar) यांनी मंगळवारी दिल्लीत (Delhi) मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal)  यांची भेट घेतली. या दोघांमधील ही भेट सुमारे दीड तास चालली. यादरम्यान दोन्ही नेत्यांनी एकत्र जेवणही केलं. या भेटीचे फोटो अरविंद केजरीवाल ट्वीट केले आहे. हे फोटो ट्वीट करत ते म्हणाले की, माझ्या घरी आल्याबद्दल नितीश कुमार यांचे खूप खूप आभार. ते म्हणाले, "देशाशी संबंधित अनेक गंभीर विषयांवर चर्चा झाली आहे. ज्यात शिक्षण, आरोग्य, ऑपरेशन लोटस, हे लोक आमदारांची खरेदी करतात आणि जनतेने निवडून दिलेली सरकारे पाडतात. भाजप सरकारांचा वाढता निरंकुश भ्रष्टाचार, महागाई, बेरोजगारी मुद्द्यांचा समावेश आहे.


या भेटीदरम्यान मनीष सिसोदिया देखील उपस्थित होते


या दोन्ही नेत्यांच्या भेटीत दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि जनता दल युनायटेडचे ​​नेते संजय झा हेही उपस्थित होते. केजरीवाल यांच्या आधी नितीश कुमार यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस डी. राजा यांचीही त्यांच्या पक्ष कार्यालयात भेट घेतली होती. तत्पूर्वी त्यांनी सोमवारी राहुल गांधी यांची भेट घेतली होती.






विरोधी पक्ष नेत्यांच्या घेत आहेत भेटी 


नितीश कुमार (Nitish Kumar) दुपारी हरियाणाचे  (Haryana) माजी मुख्यमंत्री आणि आयएनएलडी (INLD) अध्यक्ष ओम प्रकाश चौटाला (Om Prakash Chautala) यांचीही भेट घेणार आहेत. नितीश कुमार 2024 च्या निवडणुकीत (2024 Election) भाजपविरोधात सर्व विरोधी पक्षांना एकत्र करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांचा विशेष भर समाजवादी पार्श्वभूमीतील पक्षांना एकत्र आणण्यावर आहे.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Nitish Kumar Meets Rahul Gandhi: नितीश कुमार यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली, या मुद्द्यांवर झाली चर्चा
KCR Challenges: के. चंद्रशेखर राव यांचा 'भाजप मुक्त भारत'चा नारा, TRS राष्ट्रीय राजकारणात प्रवेश करणार