Aurangabad News: केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपचे नेते अमित शहा यांनी सोमवारी मुंबई दौरा केला. त्यांच्या याच दौऱ्यातून त्यांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. याच टिकेनंतर आता शिवसेनेच्या नेत्यांकडून भाजपला उत्तर दिले जात आहे. दरम्यान शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी अमित शहा यांच्यावर जहरी टीका केली आहे.' दिल्लीवरून एक राक्षस येतो आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करतो' अशा शब्दात खैरेंनी अमित शहा यांच्यावर निशाणा साधला आहे. 


मीनाताई ठाकरे यांच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने शहरातील गुलमंडी येथे शिवसेनेकडून आदरांजली वाहून भावभक्ती गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलतांना खैरे यांनी शहा यांच्यावर आज पुन्हा एकदा सडकून टीका केली. 'दिल्लीवरून एक राक्षस येतो आणि उद्धव साहेबांच्या बाबतीत बोलतो हे योग्य नाही. अमित शहा स्वतः काय होते मला माहित आहे. त्यांनी काय-काय घोटाळे केले, मर्डर केले मला सगळं माहित असल्याचं खैरे म्हणाले. याचवेळी त्यांनी भाजपवर सुद्धा टीकेचे बाण सोडले. 


अन्यथा मोदींना भाजपमधून काढणार होते... 


याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सुद्धा खैरे यांनी टीका केली. भाजप मोदींना पक्षातून काढत होते. मात्र बाळासाहेबांनी सांगितलं होत काढू नका म्हणून, असे सांगत मला अहमदाबादला मोदींकडे पाठवले होते. माझ्याच पक्षाचे लोकं मला काढण्यासाठी प्रयत्न करतायत असे नरेंद्र मोदी मला स्वतः म्हणाले होते, असेही खैरे म्हणाले.


गुलाबराव पाटलांवर निशाणा... 


यावेळी बोलतांना खैरे यांनी शिंदे गटातील मंत्री गुलाबराव पाटलांवर सुद्धा टीका केली.'तो कोण पान टपरीवाला सांगणार तो फालतू पान टपरी वाला आहे, असं खैरे म्हणाले. त्याला भाषणात मी पान टपरीवाला म्हणतो. भाषणात म्हणतो बाळासाहेबांमुळे मंत्री झालो आणि उद्धव साहेबांबद्दल उलट-सुलट बोलतात. ट*** तू औरंगाबाद ला ये तुला गोधडी दाखवतो. तू कसा आहे, काय भ्रष्टाचार केलंय आम्हाला सर्व माहिती आहे असेही', खैरे म्हणाले.


महत्वाच्या बातम्या...


Sanjay Shirsat: मी नाराज नाही, मुख्यमंत्र्यांच्या स्नेहभोजनाला जाणार; संजय शिरसाट यांचा खुलासा


Amit Shah: अहमदशाह, आदिलशहा, निजामशहा, कुतुबशहा आता अमित शाह; अंबादास दानवेंची जहरी टीका