Nitin Gadkari on PM Posion : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी पंतप्रधानपदाबाबत भाष्य केलं आहे. नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचे नाव पंतप्रधानपदासाठी चर्चिले जाते. मात्र, त्यांनीच याबाबत रोखठोक मत मांडलं आहे.  "मी कधीही पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नव्हतो. मी आज जो काही आहे, त्याने मी समाधानी आहे. मी दृढ विश्वासाने भाजपचा कार्यकर्ता म्हणून काम करतो. मी हिशोब तपासत बसणारा नेता नाही" असं मत नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी मांडले आहे. टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी भाष्य केलं.


मोदींच्या नेतृत्वात आम्ही पुन्हा सत्तेत येणार 


नितीन गडकरी म्हणाले, सबका साथ आणि सबका विकास या घोषणेवर माझा विश्वास आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात एनडीए चे सरकार अतिशय चांगले काम करत आहे. मला विश्वास आहे की, मोदींच्या नेतृत्वात पुन्हा एकदा आम्ही सत्तेत येणार आहोत. 


देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत काय म्हणाले?


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माझे मतभेद आहेत, अशा अफवा पसरवल्या जातात. फडणवीस यांच्या राजकीय जीवनातील प्रवेशापूर्वी मी त्यांच्या वडिलांसोबत बातचीत केली होती. जेव्हा एकाच क्षेत्रात दोन मोठे लोक असतील तर अशा अफवा पसरवल्या जातात. मी अशा प्रकरणात पडत नाही आणि माझी याबाबत कोणती तक्रार देखील नसते. आमच्यामध्ये कोणतेही मतभेद नाहीत. प्रदेशाध्यक्ष बावनकुळे देखील माझा सल्ला घेतात, असंही गडकरी (Nitin Gadkari) यांनी स्पष्ट केलं. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Lok Sabha 2024 : मोदी सरकारविरोधात इंडिया आघाडीचा हुंकार, शिवाजी पार्कातून फुंकलं निवडणुकीचं रणशिंग; कोण-काय म्हणालं?