Rahul Gandhi at Shivaji Park Mumbai : "देशात 22 अशी लोक आहेत, ज्यांच्याकडे एवढी संपत्ती आहे जेवढी देशातील 170 कोटी लोकांकडे आहे. भारतात आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू करण्यासाठी अनेक वर्षे लागतात. मात्र,10 दिवसांत एका लग्नासाठी विमानतळ सुरू होतं.  लग्नासाठी विमानतळ सुरू करताय करा, पण देशातील इतर भागात देखील विमानतळ सुरू करा. या लोकांनी काय चुकी केली आहे", असा सवाल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. ते शिवाजी पार्क येथील इंडिया आघाडीच्या सभेत बोलत होते. 


देशातील 90 अधिकारी देश चालवत आहेत


राहुल गांधी म्हणाले, देशातील 90 अधिकारी देश चालवत आहेत. मी या सिस्टमला समजू शकतो. मी ते आतमधून पाहिलय. त्यामुळे मोदी मला घाबरतात. सर्व काही मी पाहिले असून, मला त्यातील सर्व काही समजते. अनेक वर्ष ही सिस्टीम मी जवळून पहिली आहे. मोदी मला दाबू शकत नाहीत, असंही राहुल गांधी यांनी स्पष्ट केलं. पुढे बोलताना राहुल गांधी म्हणाले, 90 अधिकाऱ्यांमध्ये तीन दलित समाजाचे आणि एक आदिवासी समाजाचे आहेत. यामध्ये ओपनमधील एकही अधिकारी मला दाखवून द्यावा. देशाची पॉलिसी हे 90 लोकं बनवतात. त्यात आणखी 200 ते 300 आणखी लोकं जोडून घ्या, तसेच 50 ते 60 अरबपती जोडून घ्या, ही खरी शक्ती आहे जे देश चालवत आहे. यातून तुम्ही कोणीही वाचणार नाही, असं राहुल गांधी यांनी सांगितले. 


विरोधी पक्षातील नेत्यांना ईव्हीएम मशीन खोलून दाखवा


ईव्हीएम मशीन शिवाय नरेंद्र मोदी निवडणूक जिंकू शकत नाहीत. निवडणूक आयोगाला आम्ही सांगितले एक काम करा, विरोधी पक्षातील नेत्यांना ईव्हीएम मशीन खोलून दाखवा. ईव्हीएम मशीन कशाप्रकारे काम करते हे आमच्या तज्ञांना दाखवून द्या. मात्र निवडणूक आयोग यासाठी तयार नाही. मशीन मधून एक कागद निघतो, मत मशीनमध्ये नाही तर कागदावर आहे. तुम्ही मशीन चालवा पण कागदाची देखील मोजणी करा. मात्र, निवडणूक आयोग कागदाची मतमोजणी करायला तयार नाही. मतमोजणी कशी होणार नाही आणि का होणार नाही. सिस्टमला वाटत नाही की ईव्हीएमची मोजणी झाली पाहिजे. कारण हे सिस्टम तुमची आर्थिक लूट करण्याची सिस्टम आहे, असा दावाही राहुल गांधी यांनी केला. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Rahul Gandhi in INDIA alliance rally in Mumbai : माझ्या आईला फोन करून रडत सांगत होते लढण्याची ताकद नाही, जेलमध्ये जायचं नाही; राहुल गांधींचा अशोक चव्हाणांवर नाव न घेता हल्लाबोल!