Nitesh Rane on Sanjay Raut: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) कुणाची अंडरवेअर घालत आहेत ते तपासायला हवं, असं म्हणत ठाकरे गटाचे (Thackeray Group) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर भर पत्रकार परिषदेत टीकास्त्र डागलं. यालाच प्रत्युत्तर देत भाजप (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. तसेच, संजय राऊतांवर अनेक गंभीर आरोपही केले आहेत. फोडा आणि राज्य करा ही भाजपची नीती आहे म्हणे, राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ज्यावेळी शिवसेना सोडली, त्यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांनी तुमची गाडी का फोडली? असा प्रश्नही नितेश राणेंनी उपस्थित केला आहे. 


भाजप आमदार नितेश राणे म्हणाले की, "मुख्यमंत्री कुणाची अंडरवेअर घालत आहेत ते तपासायला हवं, असं म्हणतायत. राज्याच्या मुख्यमंत्र्यांबद्दल अशी अश्लील भाषा करताना तुम्हाला लाज वाटली नाही. तुमच्या अंडरवेअरवर नेमका कुणाचा बिल्ला लागला आहे. मशाल चिन्ह आहे, घड्याळ आहे की हाताचा पंजा आहे?" पुढे बोलताना नितेश राणे म्हणाले की, "फोडा आणि राज्य करा ही भाजपची नीती आहे म्हणे, संजय राजाराम राऊत यांना थोडी आठवण करून देईन, राज साहेबांनी जेव्हा शिवसेना सोडली, तेव्हा त्यांच्या कार्यकर्त्यांनी तुमची गाडी का फोडली? ठाकरे घरण्यात ज्या काही काड्या आणि भांडण लावत होतात, त्याचमुळे तुम्हाला फिरायला दिलं नाही. पवार घराण्यामध्ये तुम्ही काय काड्या लावल्यात, काय काय तमाशा केलात? ही माहिती महाराष्ट्राला दिली तर कुणी तुम्हाला घरात देखील उभं करणार नाही. आता तुमच्या मालकाच्या घरात तेजस आणि आदित्य ठाकरेंमध्ये भांडण कोण लावतंय? कोण काड्या घालतंय?"


"तुम्हाला पगार 10 जनपथवरून येतो"


भाजपवर आरोप करण्यापेक्षा स्वतःचं कॅरेक्टर बघा. कोणाकोणाच्या घरात तोडून राज्य करताय, घाणेरडं राजकारण करताय, याचा पाढा महाराष्ट्रासमोर वाचावा लागेल, असं म्हणत नितेश राणेंनी संजय राऊतांना इशारा दिला आहे. तसेच, आमच्या माहितीनुसार, आजकाल तुम्हाला पगार 10 जनपथवरून येतो, वेणूगोपाल दूत यांच्याकडून तुला किती पगार येतो? माहिती खोटी असेल तर बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घ्या आणि सांग तुला पगार येत नाही. अंडरवेअरची भाषा करायची असेल, आयटीसी, नोव्हेटल आणि ताजमध्ये कोण अंडरवेअर विसरून बाहेर पडायचा याची माहिती देऊ का? असं म्हणत नितेश राणेंनी टीका केली आहे. 


संजय राऊत नेमकं काय म्हणाले? 


संजय राऊत म्हणाले की, "शिंदे आत्ताच भाजपमध्ये गेले आहेत. तुम्ही जर त्यांची अंतर्वस्त्र पाहिलीत, तर त्यावर कमळंच आहे. त्याशिवाय ते मुख्यमंत्रीपदी राहूच शकत नाही. आताच ते गुलाम झाले आहेत आणि गुलामांना स्वतःचं मत आणि स्वाभिमान नसतो." तसेच, "दोघांनी भांडणं करावी आणि आम्ही आमचं काम साध्य करुन घ्यावं, हीच भाजपची निती आहे. तोडा आणि राज्य करा हेच भाजपचं ध्येय. सत्ता, पैसा, आपल्या उद्योगपतींना धनवान बनणं. गरीबांना गरीब बनवणं हीच त्यांची निती.", असं संजय राऊत म्हणाले. 


पाहा व्हिडीओ : Nitesh Rane : मातोश्रीवर तेजस-आदित्यमध्ये भांडण?नितेश राणेंचा दावा काय? 



महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Sanjay Raut on CM Shinde : मुख्यमंत्री आत्ताच भाजपमध्ये गेलेत, त्यांची अंतर्वस्त्र पाहिलीत, तर त्यावर कमळंच आहे : संजय राऊत