Nitesh Rane : सलीम कुत्ता (Salim Kutta) सोबत पार्टी केल्याप्रकरणी नाशिकचे ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावरून भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला असून संजय राऊत (Sanjay Raut) हे देशद्रोही आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. 


नितेश राणे म्हणाले की, गेल्या अधिवेशनात दाऊदचा जवळचा हस्तक सलीम कुत्ता याच्याबरोबर एका पार्टीचा व्हिडिओ आम्ही सरकारसमोर आणला होता. सलीम कुत्ता हा पेरोलवर बाहेर होता. पे रोल वर असताना तो सुधाकर बडगुजर यांच्यासोबत पार्टी करताना आपल्याला दिसून आला. त्यानंतर ठाकरे गटाच्या प्रमुख नेत्यांच्या पत्रकार परिषदा झाल्यात.  प्रत्येक पत्रकार परिषदेत आम्ही त्या गावातलेच नाहीत. सलीम कुत्ता आणि आमचे काहीच संबंध नाहीत, असे सांगण्यात आले. ती पार्टी झाली तिथे सलीम कुत्ता नव्हता, असेही काहींनी सांगितले. 


संजय राऊत बडगुजरचे गॉडफादर


पोलिसांनी सखोल चौकशी केल्यानंतर हे सिद्ध झालेले आहे की, सलीम कुत्तासोबत बडगुजरच आहे. बडगुजर हा महत्वाचा विषय नाही. पण बडगुजरचा गॉडफादर कोण? बडगुजर कोणाच्या मांडीला मांडी लाऊन नाशिकमध्ये फिरतो? बडगुजर कोणाची गुंतवणूक ठेवतो? तर संजय राऊतची. बडगुजरची चौकशी करत असताना संजय राऊत जो याचा गॉडफादर आहे, त्यामुळे संजय राऊतांचीही चौकशी झाली पाहिजे.  संजय राऊतांवर देशद्रोहाचा खटला चालवला पाहिजे.  1993 च्या बॉम्बस्फोटात ज्या दाऊदचा हात होता . त्याचा हस्तक सलीम कुत्तासोबत यांचे संबंध आता सिद्ध झाले आहेत. गुन्हा दाखल झाला आहे. यावरून स्पष्ट होत आहे की, संजय राऊत हा देशद्रोही आहे, असे नितेश राणे म्हणाले. 


नाशिक हायवेच्या बाजूला मदार बांधल्याचा नितेश राणेंचा आरोप


नितेश राणे पुढे म्हणाले की, मस्जिद बंदरच्या भात बाजार परिसरातील घुसखोरांना बाहेर काढणार आहे. लँड  जिहाद केला जातोय. लोकसंख्या वाढवली जात आहे. त्यांचे पाणी कापले आहे. महापालिकेने याबाबत सखोल चौकशी करावी. रोहिंगे आणि बांग्लादेशींना बाहेर काढावे, असे त्यांनी म्हटले. नाशिकच्या चांदवड येथे नॅशनल हायवेवर हिरवी चादर टाकून तिथे मजार बांधली जात आहे. साळुंखे नावाचा अधिकारी याने 20 हजार रूपये मौलानाला दिले. आम्ही नितिन गडकरी यांना सांगणार आहोत ही मजार काढून साळुंखेवर कारवाई करा. नाही तर आम्ही बाजूला हनुमानाचे मंदिर बांधू, असा इशारा नितेश राणे यांनी दिला आहे. 


आणखी वाचा 


मोठी बातमी! 1993 च्या साखळी बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी अब्दुल करीम टुंडा निर्दोष, अजमेरच्या टाडा न्यायालयाचा निकाल