Nilesh Rane vs Vaibhav Naik, कुडाळ : भाजपचे नेते, माजी खासदार आणि नारायण राणे (Narayan Rane) यांचे ज्येष्ठ पुत्र निलेश राणे (Nilesh Rane) यावेळी विधानसभेच्या रणांगणात उतरणार आहेत. निलेश राणे (Nilesh Rane) यांची स्व:ता याबाबतची इच्छा व्यक्त केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील निवळी या ठिकाणी ते आले होते. त्यावेळी पत्रकारांनी त्यांनी निलेश राणे आगामी विधानसभा निवडणुकीत काय करणार? असा सवाल केला होता. पत्रकारांच्या प्रश्नाचे उत्तर देताना निलेश राणे यांनी विधानसभा लढवणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
निलेश राणे काय काय म्हणाले?
निलेश राणे विधानसभा लढवणार आहे. यावेळी निलेश राणे विधानसभेत दिसणार आहे. शंभर टक्के निलेश राणे विधानसभा लढवणार आणि जिंकणार पण, मतदारसंघाबाबत मात्र वरिष्ठ निर्णय घेतील, अशी प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे निलेश राणे यांची राजकीय इच्छा पुन्हा एकदा दिसून आली आहे.
निलेश राणे हे माजी खासदार आहेत. 2009 मध्ये रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून ते विजयी झाले. पण, 2014 मध्ये मात्र त्यांचा पराभव झाला. शिवसेनेच्या विनायक राऊत यांच्याशी त्यांची 2014 मध्ये लढत झाली होती. दरम्यान आता निलेश राणे हे विधानसभा निवडणूक लढणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
राणे कुडाळ - मालवणमधून निवडणूक लढण्यास इच्छूक!
निलेश राणे हे कुडाळ - मालवण या विधानसभा मतदारसंघातून इच्छुक आहेत. त्याठिकाणी ते मोर्चेबांधणी देखील करत आहेत. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे वैभव नाईक त्या ठिकाणी आमदार आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत याच मतदारसंघातून भाजप अर्थात महायुतीला जवळपास 27 हजार मतांचं लीड मिळाले. यामागे निलेश राणेंची मेहनत आणि नियोजन असल्याचं देखील बोललं जातं. शिवाय, याच मतदारसंघातून वैभव नाईक यांनी 2014 मध्ये नारायण राणेंचा पराभव केला होता. परिणामी आता पुन्हा एकदा एका दशकानंतर या मतदारसंघात राणे विरूद्ध नाईक अशी लढत होणार का? हे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कळणार आहे.
शिंदेंची शिवसेना जागा सोडणार?
निलेश राणे यांनी विधानसभा लढवण्याबाबत दुजोरा तर दिला. पण, मतदारसंघाचं नाव मात्र घेतलं नाही. पण, त्यानंतर देखील मिळत असलेल्या माहितीनुसार निलेश राणे कुडाळ - मालवणमधून लढणार असल्याचं बोललं जात आहे. पण, सध्या या ठिकाणी शिवसेनेचा आमदार आहे. त्यामुळे जागावाटपाच्या प्राथमिक सुत्रानुसार ही जागा शिंदे गट भाजपला सोडणार का? हे देखील पाहावं लागेल. त्यानंतरच निलेश राणे यांचा पुढील मार्ग मोकळा होणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
उदय सामंतांविरोधात ठाकरेंची फिल्डिंग, मिलिंद नार्वेकरांचा खास दौरा; कोणता मोहरा रिंगणात उतरवणार?