Nilesh Rane on Amol Mitkari : गेल्या काही दिवसांपासून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी आणि महाराष्ट्र नवनिर्मान सेनेच्या कार्यकर्त्यांमधील वाद थांबता थांबत नाही. अमोल मिटकरी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर सुपारीबाज असं म्हणत टीका केली होती. त्यानंतर मनसेचे कार्यकर्त्यांनी थेट अमोल मिटकरी यांच्या कार्यकर्त्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. यामध्ये एका मनसे कार्यकर्त्यांचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यानंतर दोन्ही बाजूंनी टीका टिप्पणी थांबलेली नाही. दरम्यान, या प्रकरणात भाजप नेते निलेश राणे यांनी उडी घेतली आहे. त्यांनी राज ठाकरेंच्या बाजूने एक ट्वीट केले होते.
निलेश राणेंनी ट्वीटमध्ये काय काय म्हटलं?
निलेश राणे त्यांच्या ट्वीटमध्ये लिहितात, राजसाहेबांना कोण खालच्या पातळीवर जाऊन टीका करत असेल तर ते आम्हालाही सहन होत नाही, राजसाहेब कुठे आणि आपण कुठे याचं भान टीका करणाऱ्यांनी ठेवलं पाहिजे. टीका करणाऱ्यांनी लक्षात ठेवावं अजून फक्त गाड्यांच्या काचा फुटल्या, थोबाड फुटायला वेळ लागणार नाही. आताच स्वतःला आवरा.
जेव्हा नेतेमंडळी आपापसात बोलत असताना, तेव्हा चिल्लर मंडळींनी मध्ये येऊ नये
पुढे बोलताना निलेश राणे म्हणाले, खालच्या पातळीवर टीका कराल तसेच वैयक्तिक पातळीवर टीका कराल, तर यापेक्षा वाईट परिस्थिती निर्माण होईल. जेव्हा नेतेमंडळी आपापसात बोलत असताना, तेव्हा चिल्लर मंडळींनी मध्ये येऊ नये, असा टोला निलेश राणेंनी अमोल मिटकरी यांना लगावला. बोलता येत म्हणून काहीही बोलाव, राज ठाकरे यांच्या जी टीका होते ती आम्हाला देखील सहन होत नाही, असंही राणे म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या
Rajendra Raut and Manoj Jarange : आमदार राऊत म्हणाले आरक्षणाच्या मुद्द्यामुळे लोकसभेत मविआला फायदा, जरांगे म्हणाले तुमचे मराठ्याच्या जीवावर 106 निवडून आले तेव्हा?