Rajendra Raut and Manoj Jarange, अंतरवाली सराटी : बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत (Rajendra Raut) आणि तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील पुन्हा एकदा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्या भेटीसाठी अंतरवाली सराटीमध्ये गेले होते. यावेळी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर चर्चा झाली. आमदार राजेंद्र राऊत मनोज जरांगेंना म्हणाले की, मराठा आरक्षणाच्या मुद्द्याचा महाविकास आघाडीला फायदा झाला. तर भाजपचे मराठ्यांचे जीवावर 106 निवडून आले तेव्हा? असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी केला. दोघांमध्ये काय चर्चा झाली जाणून घेऊयात...
आमदार राजेंद्र राऊत काय काय म्हणाले?
आमदार राजेंद्र राऊत म्हणाले, मी स्पष्ट बोलतो. सरकारची गोची होत आहे. सरकारचा प्रतिनिधी म्हणून मी बोलत नाही. मी मराठा महासंघाचा कार्यकर्ता म्हणून भूमिका मांडतो. एकजण निर्णय घ्यायला की, दुसरी बाजू फायदा घेत आहे. हे सर्वांच्या लक्षात येत आहे. सरकारने कोणती भूमिका घेतली की, विरोधी पक्ष त्याचा फायदा घेत आहेत. ओबीसीतून मराठ्यांना आरक्षणा देण्यासाठी विरोधी पक्ष अनुकूल नाही. ते म्हणतात तुमचं तुम्ही निर्णय घ्या. आत्ता त्यांनी याचा लोकसभेला फायदा घेतला. आता हे लोक ओबीसीतून आरक्षण द्या, हे लिहून द्यायला तयार आहेत का? तर त्यांची तयार नाही. मी सरकार म्हणून कोणाची बाजू मांडत नाही. फक्त सर्वांची भूमिका एक असावी. महाराष्ट्रातील सर्वच पक्षांनी एका बैठकीला बसावं आणि सामुहिक निर्णय घ्यावा. आपला सर्वांत मोठा समाज मराठा आहे.
पुढे बोलताना राजेंद्र राऊत म्हणाले, मराठा समाजाने भोगलंय सर्वांना मान्य आहे. तुमच्या पुढे सर्वांनी येऊन एका छताखाली लिहून द्यावं. काही जण निघून जातात. परत वेगळाच कित्ता गिरवतात. आपण हे सातत्याने पाहात आलोय. जुनं तर काही काढायचं नाही. आम्ही चळवळीत कोणी काय केलयं हे पाहिलंय. आपल्याला त्या राजकारणात जायचं नाही, पण आता किती जणाची प्रामाणिक भूमिका आहे? प्रत्येक पक्ष म्हणतोय ओबीसीतून आरक्षण देता येणार नाही. उद्धव साहेबांचा असेल पवार साहेबांचा असेल किंवा मी भाजपचं पण नाव घेतो सर्वजण म्हणतात ओबीसीतून आरक्षणा देता येणार नाही, असंही राऊत यांनी स्पष्ट केलं.
मग तुमचे 106 आमदार निवडून दिले तेव्हा? 1995 ला मराठ्यांच्या जीवावर सत्तेत आले
मनोज जरांगे म्हणाले राऊत यांना प्रत्युत्तर देताना म्हणाले, तुम्ही सर्वजण ओबीसीतून आरक्षण मिळणार नाही म्हणतात. मग तुम्ही आम्हाला त्यांच्याकडून लिहून घ्या असं का म्हणतात. तुम्ही लिहून द्या ओबीसीतून आरक्षण देणार आहात ते. तुमचं भरपूर वेळ ऐकलं आता माझं ऐका. विरोधी पक्षाचं मत आहे की, मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देणार नाही. तर मग सत्ताधारी कोण आहे? त्यांना खड्ड्यात जाऊद्यात तुम्ही आरक्षण द्या. आम्ही जनता आहे, आम्हाला विरोधी पक्षाचं कारण कसं सांगू शकता? त्याला आम्ही काय करु? तुम्ही त्यांना लोकसभेला फायदा झाला म्हणून आम्हाला विचारु लागले. मग तुमचे 106 आमदार निवडून दिले तेव्हा? 1995 ला मराठ्यांच्या जीवावर सत्तेत आले. आत्ता नाही का आले मराठ्यांच्या जीवावर? आम्हाला माहिती त्यांनी काही दिलं नाही म्हणून तर आम्ही तुम्हाला द्या म्हणतोय, असंही मनोज जरांगे म्हणाले.
Manoj Jarange on Reservation : सत्ताधारी कोण आहे? त्यांना खड्ड्यात घाला, त्यांच्या @#$@ वर लाथा मारा
इतर महत्वाच्या बातम्या