अहमदनगर : निलेश लंके (Nilesh Lanke) यांचा अपघात व्हावा, त्यांचं काही बरंवाईट व्हावं यासाठी मोठ-मोठ्या पूजा घालण्यात आल्याचा गंभीर आरोप निलेश लंके यांच्या आईने (Nilesh Lanke's Mother) केला आहे. अहमदनगर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे (NCP Sharad Pawar Group) उमेदवार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयानंतर निलेश लंके यांच्या मातोश्री शकुंतला लंके (Shakuntala Lanke) यांनी सुजय विखे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. 


निलेश लंकेंच्या आईचे सुजय विखेंवर गंभीर आरोप


अहमदनगरमध्ये निलेश लंके (Nilesh Lanke) विरुद्ध भाजप उमेदवार (BJP Candidate) सुजय विखे (Sujay Vikhe) यांच्यात लढत होती. यामध्ये निलेश लंके यांनी 29317 मताधिक्याने (Nilesh Lanke Won) विजय मिळवला. समोर जड पहिलवान असताना आपला बारीक पहिलवान जिंकला अशी प्रतिक्रिया अहमदनगरचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके (Nilesh Lanke's Mother) यांच्या मातोश्री शकुंतला लंके (Shakuntala Lanke) यांनी दिली आहे. 


माझ्या लेकाचं बरंवाईट व्हावं यासाठी पूजा घातल्या


निवडणूक काळात मोठी धास्ती वाटत होती , कारण हे मोठे लोक आहेत. मशीनमध्ये घोटाळा करू शकतात, अशी चर्चा होती. एवढंच काय तर निवडणूक काळात निलेश लंके यांचा अपघात व्हावा, त्यांचं काही बरंवाईट व्हावं, यासाठी मोठ-मोठ्या पूजा घातल्या, लाखोंच्या पूजा घातल्या, असा गंभीर आरोप निलेश लंके यांच्या आईने केला आहे.


ग्रामपंचायत पातळीच्या निवडणुकीचं राजकारण त्यांनी केलं


माझ्या लेकाचं काहीतरी बरंवाईट व्हावं, अपघात व्हावा, कुठेतरी गाडीखाली व्हावं, म्हणून त्यांनी दोन-तीन लाखाच्या पूजा घातल्या. लाखोंचा खर्च केला, असा आरोप निलेश लंके यांच्या मातोश्री शकुंतला लंके यांनी केला आहे. शकुंतला लंके म्हणाल्या की, त्यांनी माझ्या मुलाचं बरंवाईट व्हावं म्हणून मोठ-मोठ्या पूजा घातल्या. दोन-दोन, तीन-तीन लाखांचा खर्च केला. कुठे पुढे मागं होऊ नये, असं त्यांनी केलं होतं. माझा फोटो काढून व्हायरल करणार असंही सांगितलं जात होतं. अगदी ग्रामपंचायत पातळीच्या निवडणुकीचं राजकारण त्यांनी केलं, असंही त्यांनी म्हटलं आहे.


पाहा व्हिडीओ : निलेश लंकेंचं बरेवाईट होण्यासाठी विंखेंनी पूजा केल्या;लंकेंच्या आईचे गंभीर आरोप



महत्त्वाच्या इतर बातम्या :


Ahmednagar Lok Sabh Election Results Live : फाडफाड इंग्रजी बोलता आलं नाही, पण धाडधाड मतं पडली; अहमदनगरमध्ये निलेश लंके विजयी, सुजय विखेंवर पराभवाची नामुष्की