Nilesh Lanke vs Sujay Vikhe, Nagar : अहमदनगर शहरातील शिवाजीनगर (Shivajinagar) परिसरात प्रचार फेरी दरम्यान एका कुटुंबाला मारहाण झाल्याची घटना समोर आलीये. ही मारहाण निलेश लंके यांच्या कार्यकर्त्यांकडून झाल्याचा आरोप करण्यात आलाय. प्रचार फेरी सुरू असताना गाडीला रस्ता देण्यासाठी विनंती केली असता ही मारहाण केल्याचं म्हटलंय. या घटनेत वृद्ध महिला जखमी झाली त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र या घटनेवरून राजकारण चांगलंच तापलं आहे. भाजप उमेदवार सुजय विखे (Sujay Vikhe) आणि मविआचे उमेदवार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी एकमेकांवर आरोप - प्रत्यारोप केले आहेत.


निलेश लंकेंनी आरोप फेटाळले 


कुटुंबाला या मारहाणीचा आमचा कोणताही संबंध नसल्याचे लंके यांनी म्हटलंय. आम्हालाच त्रास देऊन पुन्हा आमच्यावर आरोप करतात असं लंके यांनी म्हटलंय. तसेच पोलिस आणि महसूल विभागाचा वापर करून आमच्या कार्यकर्त्यांना त्रास देत असल्याचा आरोप लंके यांनी केलाय. 


कारवाई न केल्याने लंके यांच्या कार्यकर्त्यांचे मनोबल वाढलं, विखेंचा आरोप 


सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी संबंधित जखमींची रुग्णालयात भेट घेतली आहे. त्यांनी या घटनेवरून लंके (Nilesh Lanke) यांच्यावर निशाणा साधला आहे.  निलेश लंके यांनी काही दिवसांपूर्वी पोलिसांना धमकी दिली असल्याची चर्चा आहे. त्याचवेळी पोलिसांनी कारवाई करायला हवी होती. कारवाई न केल्याने लंके यांच्या कार्यकर्त्यांचे मनोबल वाढलं आणि ही घटना घडली, असं सुजय विखे यांनी म्हटल आहे.  याबाबत आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याच  सुजय विखे यांनी म्हंटले आहे.


निलेश लंकेंविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी 


निलेश लंके यांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर एका भाषणात बोलताना निलेश लंके यांनी पोलिसांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. कार्यकर्त्यांवरती कारवाई झाल्यानंतर निलेश लंके यांनी भाषणादरम्यान "इथे पोलीस विभागातील कोणी असेल तर संबंधित पीआयला सांगा तुमचा बाप दहा मिनिटात तिथे येतोय" असं विधान केलं होतं. निलेश लंकेंच्या या विधानावरुन आता महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना आक्रमक झाली असून पोलिसांचा बाप काढणाऱ्या निलेश लंके यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत होती. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Sharad Pawar on Narendra Modi : गॅस सिलेंडरचा भाव 410 वरून 1160 वर गेलाय, मोदींचा पराभव करण्याची आपली जबाबदारी, शरद पवारांचा पीएम मोदींवर हल्लाबोल