मुंबई : राष्ट्रवादी शरद पवार (Sharad Pawar) गटांच्या (NCP Meeting) नेत्यांची उद्या महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाची बुधवारी महत्त्वाची बैठक पार पडणार असून यामध्ये उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. मुंबईत शरद पवार यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडणार असून उमेदवारांची नाव निश्चित केली जाण्याची शक्यता आहे.


उद्या शरद पवार गटाची महत्त्वाची बैठक


राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची बुधवारी सकाळी 11 वाजता मुंबईत महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. मुंबईत (Mumbai) बॅलार्ड इस्टेट इथे शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठक बोलावण्यात आली आहे. लोकसभा उमेदवारांच्या नावांवर अंतिम चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उद्याच्या बैठकीत उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. 


उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता


उद्याच्या पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे इतर राज्यातील पदाधिकारी देखील उपस्थित राहतील. या बैठकीमध्ये प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार पक्षाचे जे उमेदवार आहेत त्याबाबतची माहिती दिली जाईल आणि त्यांच्या नावाचे ठराव पास केले जातील. सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे लक्षदीप चा देखील खासदार आहे. हा खासदार उद्याच्या बैठकीला उपस्थित राहणार का याकडे सर्वांचे लक्ष आहे. कारण लक्षदीप ची जागा भाजप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडली आहे तर इंडिया आघाडीमध्ये काँग्रेसने  लक्षद्वीपची जागा लढणार असल्याचे जाहीर केला आहे. त्यामुळे मोहम्मद फैजल काय निर्णय घेणार याकडे लक्ष आहे




महत्त्वाच्या इतर बातम्या :


मोठी बातमी! ठाकरे-पवारांचे शिलेदार कोण? शिवसेना-राष्ट्रवादीच्या उमेदवारांची उद्या घोषणा