मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. सर्व पक्षांकडून उमेदवारांची नावे जाहीर करण्यात येत आहे. सर्व पक्ष प्रचारामध्ये व्यस्त असल्याचं दिसून येत आहे. पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून (Maha Vikas Aghadi) कोणते उमेदवार रिंगणात उतरणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. मविआचा जागावाटपाचा तिढा लवकरच संपणार आहे. मविआच्या जागावाटपावर लवकरच शिक्कामोर्तब होणार आहे. उद्या शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्ष उमेदवार जाहीर करण्याची शक्यता असल्याची सुत्रांची माहिती आहे. 


उद्धव ठाकरे आणि शरद पवार उद्या उमेदवार जाहीर करणार


उद्या दुपारी 3 वाजता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार जाहीर होणार आहेत. मुंबईत एकत्रितरित्या पत्रकार परिषद घेत उमेदवार जाहीर केले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात महत्त्वाची बैठक पार पडली. मातोश्री बंगल्यावर पार पडलेल्या उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या बैठकीत एकमुखाने बुधवारी उमेदवारांची नावे जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


ठाकरे आणि शरद पवार गटाची यादी उद्या जाहीर होणार


लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची नावे जाहीर केली आहे. काँग्रेसनेही आधीच काही मतदारसंघातील उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. मात्र, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने उद्याप एकही उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही. त्यामुळे ठाकरे गट आणि शरद पवार गटाचे उमेदवार कोण असणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.


या मतदारसंघाचा तिढा कायम


उद्या दुपारी एक वाजता उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची बैठक पार पडेल आणि त्यानंतर एकत्रित पत्रकार परिषदेत उमेदवार घोषित करण्यात येणार असल्याची सुत्रांची माहिती आहे. अजूनही सांगली, भिवंडी आणि ईशान्य मुंबई लोकसभेचा तिढा कायम, असल्याची सूत्रांची माहिती समोर येत आहे.


कोणत्या मतदारसंघातून कुणाला उमेदवारी?


ठाकरे गटाचे संभाव्य उमेदवार



  • दक्षिण मुंबई - अरविंद सावंत

  • उत्तर-पश्चिम मुंबई - अमोल कीर्तिकर

  • उत्तर-पूर्व मुंबई -संजय दिना पाटील

  • दक्षिण मध्य मुंबई - अनिल देसाई

  • रायगड - अनंत गीते

  • रत्नागिरी-सिंधुदुर्ग - विनायक राऊत

  • ठाणे - राजन विचारे

  • धाराशिव - ओमराजे निंबाळकर

  • परभणी - संजय जाधव

  • सांगली - चंद्रहार पाटील

  • मावळ - संजोग वाघेरे

  • शिर्डी - भाऊसाहेब वाकचौरे

  • बुलढाणा - नरेंद्र खेडेकर

  • हिंगोली - नागेश पाटील आष्टीकर

  • छत्रपती संभाजीनगर - चंद्रकांत खैरे

  • यवतमाळ-वाशिम - संजय देशमुख


महत्त्वाच्या इतर बातम्या :


उर्मिला मातोंडकर सॉफ्ट पॉर्नस्टार; कंगनाचा 'तो' व्हिडीओ व्हायरल, सुप्रिया श्रीनेत अन् रणौतमध्ये ट्विटर वॉर