एक्स्प्लोर

NCP :आमदार सतीश चव्हाण विधानसभेच्या रिंगणात, भाजपच्या प्रशांत बंब यांना आव्हान देणार? सर्व्हेचा संदर्भ देत म्हणाले

Satish Chavan : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषद आमदार सतीश चव्हाण निवडणूक लढणार आहेत.

छत्रपती संभाजीनगर : आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठका सुरु आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत महायुतीच्या तीन प्रमुख पक्षांच्या नेत्यांची बैठक छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडली होती. त्याच छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची चिन्ह आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार सतीश चव्हाण (Satish Chavan) यांनी छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. सतीश चव्हाण यांनी ही माहिती एबीपी माझा सोबत बोलताना दिली. गंगापूर विधानसभा मतदारसंघात सध्या भाजपचे आमदार प्रशांत बंब (Prashant Bamb) आहेत. 

सतीश चव्हाण काय म्हणाले? 

राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार सतीश चव्हाण म्हणाले की,मागच्या दोन अडीच वर्षांपासून या मतदारसंघात काम करतोय. मतदारसंघात अस्वस्थता आहे, जसा म्हणावा तसा विकास या मतदारसंघाचा झाला नाही. कार्यकर्त्यांची देखील गेल्या 15-20  वर्षांपासून घुसमट होत आहे. मी काम करत असताना माझ्या लक्षात आलं की लोकांना बदल अपेक्षित आहे. आता सर्व्हेचा जमाना आहे, थोडं फार कमी जास्त होईल, पण जनता ज्याला पसंती देते त्याचं नाव येते. सर्व्हेमध्ये ज्याचं नाव येतं त्याला पक्ष किंवा आघाडी उमेदवारी देते, असं सध्या चालू आहे. त्यामुळं लढावं तर लागेल, सर्व्हेमध्ये पण मी पुढं येईल, असं सतीश चव्हाण यांनी म्हटलं. 

प्रशांत बंब काय म्हणाले? 

भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी यासंदर्भात भाष्य केलं आहे. सतीश चव्हाण हे  निवडणूक लढणार आहेत हे मला माहित आहे .मला कोणाच्यातरी विरोधात निवडणूक लढवायची हे नाही तर ते  त्यांनी मैदानात यावं, असं आव्हान प्रशांत बंब यांनी दिलं. सतीश चव्हाण यांच्या वरिष्ठांना आणि माझ्या वरिष्ठांना ही सगळी माहिती आहे की ते  निवडणूक लढतील. वरिष्ठ काय तो निर्णय घेतील, असं प्रशांत बंब म्हणतील. मी विकासाच्या जीवावर निवडणूक लढणार आहे.पंधरा वर्षात महाराष्ट्रात एक वेगळा मतदार संघ मी निर्माण केलाय, असंही ते म्हणाले. 

गंगापूर विधानसभा निवडणुकीत 2019 ला काय घडलेलं? 

गंगापूरमध्ये 2019 ची विधानसभा निवडणूक तिरंगी झाली होती. प्रशांत बंब हे त्या निवडणुकीत विजयी झाले होते. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे संतोष माने पाटील आणि वंचितचे अंकुश कळवणे होते. प्रशांत बंब यांना 107193 मतं मिळाली होती तर राष्ट्रवादीच्या माने पाटील  यांना 72222 मतं मिळाली होती. वंचितच्या अंकुश कळवणे यांना 15951 मतं मिळाली होती. 

इतर बातम्या :

Uddhav Thackeray : अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर असताना उद्धव ठाकरेंचा भाजपला धक्का, बडा नेता समर्थकांसह मुंबईकडे रवाना 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Aaditya Thackeray : एकनाथ शिंदेंची मिमिक्री ते भाजपवर प्रहार, लोकसभेचं यश ते विधानसभेतील वोटर फ्रॉड; निर्धार मेळाव्यातून आदित्य ठाकरेंची जोरदार फटकेबाजी
एकनाथ शिंदेंची मिमिक्री ते भाजपवर प्रहार, लोकसभेचं यश ते विधानसभेतील वोटर फ्रॉड; निर्धार मेळाव्यातून आदित्य ठाकरेंची जोरदार फटकेबाजी
Nilesh Lanke : औरंगजेबाच्या कबरीबाबत सरकारचा वेळकाढूपणा, निलेश लंकेंनी डागली तोफ; म्हणाले, फडणवीसांनी ठरवलं तर...
औरंगजेबाच्या कबरीबाबत सरकारचा वेळकाढूपणा, निलेश लंकेंनी डागली तोफ; म्हणाले, फडणवीसांनी ठरवलं तर...
Suresh Dhas : ...तर धनंजय मुंडे आकाच्या शेजारी जाणार; सुरेश धसांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, मला त्यांची कीव येते!
...तर धनंजय मुंडे आकाच्या शेजारी जाणार; सुरेश धसांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, मला त्यांची कीव येते!
चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलनंतर रोहित शर्मा घेणार निवृत्ती?
चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलनंतर रोहित शर्मा घेणार निवृत्ती?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Deshmukh:Krushna Andhale ला पोलिसांकडूनच अभय मिळत होतं,पोसणाऱ्यांनीच त्याला शिक्षा द्यावीMNS Vardhapan Din Special Report : राज ठाकरेंचा मनसैनिकांना कोणता कानमंत्र?Baramati Aakrosh Morchaदेशमुख हत्या प्रकरणी बारामतीत आक्रोश मोर्चा,3 महिन्यानंतरही कृष्णा आंधळे फरारSpecial Report Marathi :हॉटेलात मेन्यू कार्ड मराठी करा,ठाकरेंच्या शिवसेनेचा आग्रह, मुंबईकर म्हणतात..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aaditya Thackeray : एकनाथ शिंदेंची मिमिक्री ते भाजपवर प्रहार, लोकसभेचं यश ते विधानसभेतील वोटर फ्रॉड; निर्धार मेळाव्यातून आदित्य ठाकरेंची जोरदार फटकेबाजी
एकनाथ शिंदेंची मिमिक्री ते भाजपवर प्रहार, लोकसभेचं यश ते विधानसभेतील वोटर फ्रॉड; निर्धार मेळाव्यातून आदित्य ठाकरेंची जोरदार फटकेबाजी
Nilesh Lanke : औरंगजेबाच्या कबरीबाबत सरकारचा वेळकाढूपणा, निलेश लंकेंनी डागली तोफ; म्हणाले, फडणवीसांनी ठरवलं तर...
औरंगजेबाच्या कबरीबाबत सरकारचा वेळकाढूपणा, निलेश लंकेंनी डागली तोफ; म्हणाले, फडणवीसांनी ठरवलं तर...
Suresh Dhas : ...तर धनंजय मुंडे आकाच्या शेजारी जाणार; सुरेश धसांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, मला त्यांची कीव येते!
...तर धनंजय मुंडे आकाच्या शेजारी जाणार; सुरेश धसांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, मला त्यांची कीव येते!
चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलनंतर रोहित शर्मा घेणार निवृत्ती?
चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलनंतर रोहित शर्मा घेणार निवृत्ती?
Beed Crime  : बीडमध्ये रक्षकच बनला भक्षक! महिलादिनी पोलिसाने महिलेला बोलावून घेतलं अन्...; परिसरात खळबळ
बीडमध्ये रक्षकच बनला भक्षक! महिलादिनी पोलिसाने महिलेला बोलावून घेतलं अन्...; परिसरात खळबळ
जगात कोणत्या देशाचे चलन सर्वात महाग आहे?
जगात कोणत्या देशाचे चलन सर्वात महाग आहे?
Virat Kohli Profile : क्रिकेटचा 'किंग', क्रीजवर टिकला की विरोधी संघाला सळो की पळो करून सोडणारा लढवय्या 'विराट'
क्रिकेटचा 'किंग', क्रीजवर टिकला की विरोधी संघाला सळो की पळो करून सोडणारा लढवय्या 'विराट'
IND vs NZ Final : चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या टीमला जॅकपॉट लागणार, जो जिंकेल त्याच्यावर पैशांचा पाऊस; जाणून घ्या नेमकं काय-काय मिळणार?
चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या टीमला जॅकपॉट लागणार, जो जिंकेल त्याच्यावर पैशांचा पाऊस; जाणून घ्या नेमकं काय-काय मिळणार?
Embed widget