Sunetra Pawar Rajya Sabha Candidate: पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघात (Baramati Lok Sabha Constituency) सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याकडून पराभव झाल्यावर आता सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) संसदेत बॅकडोअर एन्ट्री घेणार आहेत. सुनेत्रा पवार यांच्या नावावर राष्ट्रवादीचं शिक्कामोर्तब झालंय अशी एनसीपीतल्या वरिष्ठ नेत्यांनी एबीपी माझाला माहिती दिली आहे. दरम्यान, सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीवरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) नाराज असल्याचीही माहिती मिळत आहे.  


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बुधवारी रात्री उशिरा देवगिरी निवासस्थानी बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. आज दुपारी दीड वाजता सुनिता पवार पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीमध्ये आपला राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करतील. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून या जागेसाठी छगन भुजबळ, पार्थ पवार, आनंद परांजपे, बाबा सिद्दिकी इच्छुक होते. 


सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीवरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील एक गट नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. पक्षात केवळ सुनील तटकरे, अजित पवार आणि प्रफुल पटेल हेच निर्णय घेत असून इतरांशी निर्णय प्रक्रियेबाबत सल्लामसलत होत नसल्यानं एका गटात नाराजी असल्याचं पाहायला मिळत आहे. ऐनवेळी उमेदवारी घोषित केली जात असेल तर याचा अर्थ उमेदवार आधीच निश्चित करण्यात आला आहे, मग उगाचच उमेदवारीसाठी वेळ का घालवण्यात आला? असा सवाल बुधवारी देवगिरीवर झालेल्या बैठकीत मंत्री छगन भुजबळ यांनी पक्षाचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्ष प्रश्न विचारला आहे. 


सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीनं छगन भुजबळ नाराज


राज्यसभेसाठी सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीवरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ नाराज असल्याची माहिती मिळत आहे. पक्षात केवळ सुनील तटकरे, अजित पवार आणि प्रफुल पटेल हेच निर्णय घेत असून इतरांशी निर्णय प्रक्रियेबाबत सल्लामसलत होत नसल्यानं छगन भुजबळांनी नाराजी व्यक्त केली आहे. ऐनवेळी उमेदवारी घोषित केली जात असेल तर याचा अर्थ उमेदवार आधीच निश्चित करण्यात आला आहे, मग उगाचच उमेदवारीसाठी वेळ का घालवण्यात आला? असा प्रश्नही छगन भुजबळांनी अध्यक्ष, कार्याध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्षांना विचारला आहे. लोकसभेच्या पराभूत उमेदवाराला बॅक डोअर एन्ट्री का दिली जातेय असाही सवाल छगन भुजबळांकडून करण्यात आला आहे.  


एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री उशीरा देवगिरी निवासस्थानी झालेल्या बैठकीत नाराजी नाट्याचा अंक रंगल्याचं पाहायला मिळालं. मात्र, राष्ट्रवादीतील नाराजी नाट्यानंतर देखील सुनेत्रा पवार यांनाच उमेदवारी देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Sunetra Pawar: राज्यसभेसाठी राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब; आजच उमेदवारी अर्ज दाखल करणार


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI