मुंबई : निवडणुकांपूर्वी शक्तिपीठ महामार्गाबाबत मवाळ भूमिका घेणाऱ्या राज्य सरकारने आता शक्तिपीठ महामार्ग (Shaktipith) होणारच अशी भूमिका घेतली आहे. त्याच अनुषंगाने यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शक्तिपीठ महामार्गावर चर्चा होत असून विरोधकांकडून या महामार्गातील शेतकऱ्यांच्या जमिनीचा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे. आमचा विकासकामांना विरोध नाही, पण शक्तिपीठ महामार्गामुळे हजारो शेतकऱ्यांच्या उपजिविकेचा, शेतीचा प्रश्न, उपस्थित होणार आहे, त्याचे काय, असा सवाल विचारला जात आहे. आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी होत आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील (Jayant Patil) यांनी आपली भूमिका मांडली. त्यावेळी, राजू शेट्टींचा सदर्भ देत त्यांनी केलेल्या एका वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. माझी गॅरंटी घेऊ नका, माझ काही खरं नाही, असे जयंत पाटील यांनी आझाद मैदानात सुरू असलेल्या आंदोलनात उपस्थित राहून म्हटले. तसेच, माझा सल्ला शेट्टी ऐकत नाहीत, नाहीतर ते आज खासदार असते असेही जयंत पाटील यांनी म्हटले. 

Continues below advertisement


सरकार नवे नवे रस्ते करण्यात का इंटरेस्ट घेते हे कळत नाही,  मोठे प्रकल्प घ्यायचे त्यातून निधी उपलध करायचा. राजू शेट्टी यांना माहिती आहे की, निवडणुकांमध्ये किती पैसे वाटले जातात, त्यांना चांगला अनिभव आहे, असे जयंत पाटील यांनी म्हटले. तसेच, विकासासाठी आमचा विरोध नाही, पण ज्याची जमीन जात असेल त्यांची उपजिवीका दुसरी काही नसेल तर काय. नियमाने इकडे तिकडे असं करू नका, सरकार पैसे देते, मग मॅनेज होत असाल तर व्हा. आम्ही भाषण करुन दमलो, कारण लोकांना पैसे देऊन शांत केले जाते. निर्धाराने आलात तर निर्धार टिकला पाहिजे, असे जयंत पाटील यांनी आंदोलकांना उद्देशून म्हटले. दरम्यान, आम्हाला जमीन वाचवायची आहे, पैसे नकोत अशी शेतकऱ्यांची भूमिका असल्याचं पाहायला मिळालं. 


मोठी साखळी महाराष्ट्रात निर्माण झाली आहे, ठराविक चार-सहा व्यक्तींना हे टेंडर दिले जाते, महाराष्ट्र सरकारमधील जे टेंडर निघतंय ते डोक्यात घ्या. आमचा दारुण पराभव झाल्यामुळे खात्री वाटतं नाही, लोक ऐकत नाही का?  हे हिंदुत्वाचा झालं पाहिजे यात आपण विसरून जातो की शक्तिपीठ अंगावरुन चाललंय. माझ काही खरं नाही, माझ्यावर विश्वास ठेवू नका असे खळबळजनक वक्तव्य जयंत पाटील यांनी यावेळी केले. 


राजू शेट्टी झेडा सोडत नाहीत 


माझा सल्ला राजू शेट्टी ऐकत नाही. आपली एकी कायम ठेवा, संघर्ष करायला ठाम रहा, मोजणीला अटकाव ठेवा. आमचा दारुण पराभव झालाय. आम्ही बोलायचं हळूहळू कमी झालोय, कारण बोलून लोकांना काही समजत नाही. दुसरच हिंदुत्व वैगरे समोर असतं, पण तुमच्या अंगावरुन शक्तीपीठ जाईल, राजू शे्ट्टींनी एकदा झेंडा घेतला तर ते सोडत नाहीत असेही जयंत पाटील यांनी म्हटले. यावेळी, शेतकऱ्यांनी तुम्ही देखील आंदोलनात हवं, असं म्हटलं. त्यावर, माझी गॅरंटी घेऊ नका, माझं काही खरं नाही, असे जयंत पाटील यांनी म्हटले. त्यावर, अनेकांनी भुवया उंचावल्या 



हेही वाचा


मोठी बातमी! जन्म-मृत्यू प्रमाणपत्रासाठी आता कडक नियम; कायद्यात बदल, महसूलमंत्र्यांचा महत्त्वाचा निर्णय