Vijay Wadettiwar on Khokya Arrest: सतीश भोसले उर्फ खोक्याला प्रयागराजमधून अटक करण्यात आली असून हा आमदार सुरेश धस यांचा गुंड कार्यकर्ता आहे. काही दिवसांपूर्वी सतीश भोसले ने केलेल्या मारहाणीचे व्हिडिओ व्हायरल झाले होते. काही दिवसांपासून फरार असलेला खोक्या आता अटकेत आहे.दरम्यान या प्रकारावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत .खोक्याचा अटकेवरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी काकांचा आका शोधला आता खोक्यांचा बोका शोधावा असे म्हणत सरकारला सुनावलंय . पोलिसांना सोयीचा माणूस सापडतो मात्र गैरसोयीचा सापडत नाही . असेही वडेट्टीवार म्हणाले . (Vijay Wadettiwar)
काय म्हणाले वडेट्टीवार?
'खोके म्हटले की खोक्यामागचे बोके कोण आहेत तेही समजावे .इकडे आकांचा आका शोधला तसा खोक्याचा बोका शोधावा असे वडेट्टीवर म्हणाले .हे शोधलं तर आनंद होईल .हे खोके कुठून येतात ?सोन्याचा खजाना कुठून येतो ?त्याला कोणाचा आशीर्वाद आहे सगळं शोधून काढ . पोलीस दिसले की आधी चड्डी पिवळी व्हायची..आता काय परिस्थिती आहे.गुन्हे आणि घटनांवरून असं दिसतं की पोलिसांचा मनोबल घसरलंय .पोलिसांची लढण्याची क्षमता आता कमी झाली आहे .धाक कमी झालाय .त्यांच्यावरचा राजकीय हस्तक्षेप आणि दबाव अधिक वाढलाय .पोलीस स्टेशन मध्ये गोळीबार होतो .धाक दरारा असलेला पोलीस असायला हवा .स्कॉटलंड पोलिसांसोबत तुलना आपण करायचं .राजकीय मंडळी पोलिसांना चप्पल गाड्या धुवायला लावतात .पोलिसांची अवहेलना करायला लागले तर कायदा आणि सुव्यवस्था कशी असेल ?पोलीस बॅक फुटवर गेले आहेत .आधी त्यांना कायद्याने काम करायची मुभा होती .गृहमंत्र्यांना मागणी आहे यावर लक्ष द्या अन्यथा हा भाग होमगार्ड होईल .' असे वडेट्टीवार म्हणाले.
सतीश भोसले नेमका कोण ?
बीडमध्ये गेल्या काही महिन्यांपासून वाल्मिक कराडची बीडमधील दहशत ,संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण, त्यांना क्रूरपणे केलेल्या मारहाणीची घटना ताजी असतानाच बीडच्या शिरूर कासार तालुक्यात एका व्यक्तीला अमानुषपणे बेदम मारहाण करत त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला .यात मारहाण करणारा व्यक्ती सतीश भोसले उर्फ खोक्या वर गुन्हा दाखल झाला होता .वाल्मीक कराड आणि त्याची दहशत बाहेर काढणाऱ्या सुरेश धस यांचा हा गुंड कार्यकर्ता आहे .गेल्या सहा ते सात वर्षांपासून तो राजकारणात सक्रिय आहे .शिरूर कासार भागात खोक्या नावाने त्याची दहशत आहे .स्थानिक पातळीवर गोल्डमॅन म्हणून त्याची ओळख आहे .पार्टी खोके आणि गोल्डमॅन अशी त्याची टोपण नावे आहेत .आलिशान गाड्यांचा ताफा आणि गराड्यात राहत असल्यामुळे सतीश भोसले मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे .सतीश भोसलेची राजकीय पाठबळ गुंडगिरी आणि दहशतीचे पार्श्वभूमी आहे .
हेही वाचा: