Jitendra Awhad : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार हे आम्हाला निवडणूक आयोगाने (Election commission of india) नावं दिल आहे. हेच नावं आम्हाला हवं होत आणि तेच मिळालं. आता यांना राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्ष अजित पवार (Ajit Pawar) अलीबाबा चालीस चोर पार्टी नावं देणार आहे. कारण त्यांनी पाकीटमारासारखं आमचं घड्याळ (NCP) मनगटावरून चोरलं, असा हल्लाबोल जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केला. ते ठाण्यात बोलत होते. 


निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्ष असं नावं आम्हाला दिलं आहे. यांनी घड्याळ मनगटावरून पाकीटमारासारखं चोरलं. पण आमचं मनगट मजबूत आहे. आमचा पक्ष, आमचं नावं शरद पवार हे मी आधीच सांगत होतो, असे आव्हाड म्हणाले. आयोगाचा निर्णय दुटप्पी, संभ्रम निर्माण करणारा आहे. हा पक्ष बळकट करण्याचे कोणाचे प्रयत्न होते? हा पक्ष कोणी मोठा केला? यावर धडान्त खोटं निवडणूक आयोग बोललय. निवडणूक आयोग कटपुतली झालेय, असेही आव्हाड म्हणाले.


शरद पवार मजबूतीनं उभे राहतील - आव्हाड 


निवडणूक आयोगाला 30 तारखेला जे घडलं ते टाळायचं होत, बंद खोलीत काय घडलं ते दाखवायचं नव्हतं. काल तुम्ही प्लान करुन पवार साहेबांचा गळा घोटला, तुम्हाला लाज वाटली नाही का? तुम्ही किती काहीही करा, तुम्ही पाकीटमारासारखं मनगट चोरलंय, पवार साहेबांचं मनगट मजबूत आहे, पवार साहेब अजुन मजबुतीने उभे राहतील, असा विश्वास यावेळी आव्हाडांनी व्यक्त केला. 


धनंजय मुंडेंना टोला - 


काल एक जण बोलला आव्हाड घरात भांडण लावतोय. तुम्ही तुमच्या काकाला किती त्रास दिला? बहिणीला किती त्रास दिला हे सर्व परळीकरांना माहिती आहे, असा टोला धनंजय मुंडे यांना लगावला. नियती कसा सूड घेईल हे आता काळ बघेल. शरद पावरांना संपवन्याशिवाय त्यांना महाराष्ट्रात काही करता आलं नसतं, हे त्यांना माहित होत आणि त्याला मदत त्यांच्याच घरातून झाली. महाराष्ट्राच्या मनात राग आहे पवार साहेबांना तुम्ही छळलंय त्याचं उत्तर महाराष्ट्राले तरुण, तरुणी,वयस्कर देतील, असेही आव्हाड म्हणाले. 


ज्या काकीने खायला घातलं तिचंचं कुंकू पुसायला निघालेत - 


शरद पवार साहेबांनी घेतलेले निर्णय राज्याच्या हिताचे आहे. यांनी यांचा एक निर्णय दाखवावा. ज्या माणसाने तुम्हाला घडवलं तोच अजरामर राहील. हम लढेंगे और जितेंगे, असा विश्वास आव्हाडांनी व्यक्त केला. अजित पवार यांना पुन्हा उपमुख्यमंत्री पद देण ही सर्वात मोठी चूक होती. स्वतः चा पुतण्या पायावर पडून रडायला लागला तर काय करणार पवार साहेब. ज्या काकीने खायला घातलं, वाढवलं तिचंचं कुंकू पुसायला निघालेत, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. 


राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार अलीबाबा चालीस चोर पार्टी 


निवडणूक आयोग मॅनेज झालं होतं. एकीकडे ठाकरेंच घर उद्वस्त करायचं, शरद पवार यांना वाकवायचं, शरण येतील का हे बघायचं. अरे हे बहुआयामी वक्तिमत्व आहे. लोकशाही वाचवण्यासाठी आता बाहेर पडायचं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार हे आम्हाला निवडणूक आयोगाने नावं दिल आहे हेच नावं आम्हाला हवं होत आणि तेच मिळालं, आता यांना नावं देणार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार अलीबाबा चालीस चोर पार्टी कारण त्यांनी पाकीटमारासारखं आमचं घड्याळ मनगटावरून चोरलं. त्यांना कशावर ही दावा करु द्या, महाराष्ट्रातल्या जनतेला कळू तर द्या. मी भांडण लावत नाही पण आता भांडण लावणार आहे. ज्या पद्धतीने तुम्ही पवार साहेबांना छळलंय त्याचे भोग तुम्हाला भोगावे लागतील, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले. 


आणखी वाचा :


Sharad Pawar : ठाकरे गटाप्रमाणेच शरद पवारांच्या पक्षाचं तात्पुरतं मिळालेलं नाव आणि चिन्हही कायम राहण्याची शक्यता: अॅड. सिद्धार्थ शिंदे