मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक नक्की कोणाबरोबर यावर आज अखेर स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी शिक्कामोर्तब झाले आहे. तब्यतेच्या कारणावरून अतंरीम जामीनावर बाहेर असलेले नवाब मलिकांचा पाठींबा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पाठींबा असल्याचे जाहीर केले आहे. नवाब मलिक यांनी आपल्या एक्स (पूर्वीचे ट्विटर) प्रोफाईलमध्ये घड्याळ वापरण्यास सुरूवात केली आहे.
नवाब मलिक हे सध्या वैद्यकीय जामिनावर बाहेर आहे.तर आतापर्यंत त्यांनी आपण राष्ट्रवादीच्या दोन्ही गटापैकी कोणत्या गटात सहभागी होणार याबाबत भूमिका स्पष्ट केली नव्हती. दरम्यान, मागील 6 महिन्यांपासून नवाब मलिक यांनी घड्याळ चिन्ह वापरणं बंद केलं होतं. मलिक यांच्याकडून सातत्यानं आपण कोणत्याच गटासोबत नसल्याच जाहीर करण्यात आलं होतं. मात्र बुधवारपासून नवाब मलिक यांनी घड्याळ चिन्ह वापरण्यास सुरूवात केली आहे. अजित पवार यांची जनसन्मान यात्रा देखील 20 तारखे नंतर नवाब मलिक यांचा मतदारसंघात जाणार आहे.
अखेर नवाब मलिकांची भूमिका जाहीर
सहा महिन्यापूर्वी नवाब मलिक तब्येतीच्या कारणावरुन अंतरिम जामिनावर बाहेर आले. मधल्या काळात राज्यात बऱ्याच उलथापालथी झाल्या. अजितदादांनी वेगळी चूल मांडत भाजपसोबत घरोबा केला अन् थेट सरकारमध्ये सहभागी झाले. त्यामुळे नवाब मलिक दादांसोबत की काकांसोबत हा प्रश्न विचारला जाऊ लागला होता . त्याचं क्लिअर कट उत्तर आज मिळालं. नवाब मलिक तुरुंगातून बाहेर आले, तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस दोन गटांत विभागलेली होती. त्यामुळे ते कोणत्या गटात सामील होणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागलं होतं. सुरुवातीला त्यांनी तटस्थ भूमिका घेतली. मात्र त्यांनी अजित पवार गटाला साथ देण्याचा निर्णय घेतला.
महायुतीत महाभारत होण्याची शक्यता
मात्र नवाब मलिकांच्या या भूमिकेमुळे महायुतीत महाभारत होण्याची शक्यता आहे. कारण काही महिन्यांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लिहिलेलं पत्र होतं. नवाब मलिक यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक झाली होती, त्यांना महायुतीत सामावून घेणे योग्य ठरणार नाही, सत्ता येते आणि जाते पण सत्तेपेक्षा देश महत्वाचा आहे या अटलबिहारी वाजपेयींच्या वाक्यांचाही फडणवीसांच्या पत्रात उल्लेख केला होता.
हे ही वाचा :