नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक (Nawab Malik) यांनी हिवाळी अधिवेशनासाठी (Winter Session) नागपुरात हजेरी लावली. यावेळी अजित पवार (Ajit Pawar) आणि शरद पवार (Sharad Pawar) गटातील नेत्यांनी नवाब मलिक यांची भेट घेतली. सभागृह परिसरात नवाब मलिक आणि अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांची गळाभेट झाली. यानंतर सभागृहाचं कामकाज सुरु झाल्यानंतर नवाब मलिक सत्ताधारी पक्षाच्या बाकावर सर्वात शेवटी बसले. त्यामुळे नवाब मलिक यांनी अजित पवार गटाला पाठिंबा दिल्याचं स्पष्ट झालं आहे.


आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू झाले असून, हे अधिवेशन वेगवेगळ्या कारणाने चर्चेत आला आहे. त्यातच आमदार नवाब मलिक हे कोणत्या गटात सहभागी होणार याबाबत कालपासून चर्चा सुरू असतानाच, नवाब मलिक सत्ताधारी बाकावर बसल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे मलिक हे सत्तधारी बाकांवर सर्वात शेवटी बसले आहे. त्यामुळे आता मलिक अजित पवार गटात सहभागी झाल्याचे चर्चा पाहायला मिळत आहे. 


अनिल देशमुखांची गळाभेट...


आजपासून सुरु होत असलेल्या हिवाळी अधिवेशनात नवाब मलिक देखील सहभागी झाले आहेत. नवाब मलिक हे सध्या वैद्यकीय जामिनावर बाहेर आहे.तर आतापर्यंत त्यांनी आपण राष्ट्रवादीच्या दोन्ही गटापैकी कोणत्या गटात सहभागी होणार याबाबत भूमिका स्पष्ट केली नव्हती. दरम्यान, आज विधानभवनात दाखल होताच मलिक यांची माजी गृहमंत्री तथा शरद पवार गटाचे आमदार अनिल देशमुख यांच्यासोबत भेट झाली. एकमेकांच्या समोर आल्यावर या दोन्ही नेत्यांनी गळाभेट घेतली. 


अधिकृत भूमिका स्पष्ट नाहीच...


वैद्यकीय जामिनावर बाहेर आल्यावर नवाब हे शरद पवार गटात की अजित पवार गटात जाणार याबाबत मोठी चर्चा झाली. मात्र, यावेळी मलिक यांनी कोणतेही भूमिका न घेता तटस्थ राहणे पसंद केले. त्यामुळे मलिक कोणत्या गटात सहभागी होणारा यावरून वेगवेगळ्या चर्चा झाल्या. दरम्यान, हिवाळी अधिवेशनासाठी पोहचलेल्या मलिक यांनी सत्ताधारी बाकांच्या शेवटी बसणे पसंद केले. असे असलं तरीही मलिक यांनी अधिकृत भूमिका मात्र अजूनही स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे त्यांची अधिकृत भूमिका काय असणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. त्यामुळे जेवढी चर्चा अधिवेशनाची सुरु आहे, तेवढीच चर्चा नवाब मलिक यांच्या भूमिकेची देखील आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


नवाब मलिक नेमके कोणत्या गटासोबत? राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांची पंचाईत, सर्व आमदार बसणार एकत्र